नवी दिल्ली : काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला. आस्ट्रेलियानं भारतीय संघाला पराभवाची धूळ चारत वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं. टीम इंडियानं स्पर्धेच्या सुरुवातीपासून एकही सामना गमावला नसल्यानं भारतीय चाहत्यांना अंतिम फेरीतील विजयाबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियानं सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. यानंतर भारतीय संघासह कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाचे खेळाडू देखील वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगल्यानं निराश झालेले पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात सामना पाहण्यासाठी दाखल झाले होते. सामन्यानंतर त्यांनी खेळाडूंची भेट घेतली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा यांनी यांनी या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत.

मोहम्मद शमी याचं ट्विट

मोहम्मद शमी यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. दुर्दैवानं कालचा दिवस आमचा नव्हता. मी सर्व भारतीयाचं आमच्या टीमला संपूर्ण स्पर्धेत पाठिंबा देण्यासाठी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील विशेष आभार त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये येत आमचं स्पिरीट वाढवलं असून आम्ही पुन्हा पलटवार करु, असं मोहम्मद शमीनं म्हटलं.

कमिन्सचं अभिनंदन न करता उपपंतप्रधानांना घेऊन निघून गेले; मोदींच्या VIDEO मागचं सत्य काय?

रवींद्र जडेजाकडून फोटो पोस्ट

रवींद्र जडेजान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केला पण आम्ही काल कमी पडलो. आमचं स्वप्न भंगलं पण लोकांचा पाठिंबा कायम आहे. नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये भेट देत खेळाडूंना प्रेरणा दिली, असं जडेजा म्हणाला.
रिकाम्या स्टेडियममध्ये ट्रॉफी दिली…, भारताचं स्वप्न भंगल्यानंतरही ऑस्ट्रेलियन माध्यमं भडकली, म्हणतात…
दरम्यान, टीम इंडियानं वर्ल्डकपमध्ये १० मॅचमध्ये विजय मिळवला. मात्र, अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियानं केलेल्या सांघिक कामगिरीपुढं विजयाची मालिका कायम ठेवता आली नाही. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियानं ६ विकेट राखून पराभूत करत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळं कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं.

अरे, माझी टीम का येत नाही स्टेजवर? वर्ल्डकप हाती येताच कमिन्स वेटिंगवर; VIDEO पाहाच

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत हरला, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं

Read Latest Maharashtra News And Marathi News





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *