नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांचे मंत्रालयालयासमोर आंदोलन:धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षणास विरोध

नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांचे मंत्रालयालयासमोर आंदोलन:धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षणास विरोध

सरकारमध्ये असूनही आमचे ऐकले जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्याला विरोध करत झिरवळ यांनी मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला समाजाने सभागृह पाठवले आहे. त्यामुळे आम्ही समाजासाठी भांडणार असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. मात्र राजीनामा देणे हा पर्याय नाही. आम्हाला समाजाने समाजासाठी भांडण्याला सभागृहात पाठवला आहे. आम्ही देखील समाजासाठी भांडण करायला तयार असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी आजपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केले आहे. या आंदोलनात त्यांच्यासोबत इतर आदिवासी आमदार देखील सहभागी झाले आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांनी कडाडून विरोध केला जात आहे. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिले, तर आम्हाला काहीच उरणार नाही. त्यानंतरही सरकारने त्यांना अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर सर्वच पक्षांतील 24 आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा या आमदारांकडून देण्यात आला आहे. नरहरी झिरवाळ यांचा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारने धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. पण हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावायला हवे होते. सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे ते यासंबंधी म्हणाले होते. आता त्यांनी थेट आंदोलन केले आहे. धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच नाही नरहरी झिरवाळ यांनी धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचा दावाही फेटाळला आहे. धनगर व धनगड जात एकच आहेत. स्पेलिंग चुकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. असे असते तर एवढी वर्षे ही गोष्ट कुणाच्याही लक्षात का आली नाही? विशेषतः यामुळे ही सूची तयार करणाऱ्याला इंग्लिश येत नसावी का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… धारावीच्या मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात:या आधी मनपाला झाला होता मोठा विरोध धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला होता. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतेच ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा… पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला:गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळे मधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केली आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव:परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा BJP वर जोरदार हल्ला तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते. मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला. ही परिवर्तनाची चाहूल असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण बातमी वाचा…

​सरकारमध्ये असूनही आमचे ऐकले जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्याला विरोध करत झिरवळ यांनी मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला समाजाने सभागृह पाठवले आहे. त्यामुळे आम्ही समाजासाठी भांडणार असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. मात्र राजीनामा देणे हा पर्याय नाही. आम्हाला समाजाने समाजासाठी भांडण्याला सभागृहात पाठवला आहे. आम्ही देखील समाजासाठी भांडण करायला तयार असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी आजपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केले आहे. या आंदोलनात त्यांच्यासोबत इतर आदिवासी आमदार देखील सहभागी झाले आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांनी कडाडून विरोध केला जात आहे. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिले, तर आम्हाला काहीच उरणार नाही. त्यानंतरही सरकारने त्यांना अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर सर्वच पक्षांतील 24 आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा या आमदारांकडून देण्यात आला आहे. नरहरी झिरवाळ यांचा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारने धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. पण हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावायला हवे होते. सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे ते यासंबंधी म्हणाले होते. आता त्यांनी थेट आंदोलन केले आहे. धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच नाही नरहरी झिरवाळ यांनी धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचा दावाही फेटाळला आहे. धनगर व धनगड जात एकच आहेत. स्पेलिंग चुकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. असे असते तर एवढी वर्षे ही गोष्ट कुणाच्याही लक्षात का आली नाही? विशेषतः यामुळे ही सूची तयार करणाऱ्याला इंग्लिश येत नसावी का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… धारावीच्या मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात:या आधी मनपाला झाला होता मोठा विरोध धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला होता. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतेच ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा… पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला:गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळे मधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केली आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव:परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा BJP वर जोरदार हल्ला तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते. मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला. ही परिवर्तनाची चाहूल असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment