राज्यात ईव्हीएमविरुद्ध विरोधक जन आंदोलन उभे करणार:शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची माहिती
निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणे यापेक्षा दोन दिवस वाया गेलेले चालतील, असे म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमवर टीका केली आहे. या विरोधात विरोधकांना विश्वासात घेऊन राज्यात जनआंदोलन उभे करावे लागणार असल्याचे, ते म्हणाले. दिल्लीत शेतकऱ्यांचे ज्या पद्धतीने आंदोलन झाले होते. त्या पद्धतीने येथे आंदोलन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएम वर सुप्रीम कोर्ट सुनावणी दरम्यान दोन-चार दिवस मतमोजणी प्रक्रिया होईल, अशी टिपप्णी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मात्र चुकीचे सरकार निवडल्यापेक्षा चुकीची पद्धत वापरल्या गेल्यापेक्षा चार दिवस लागलेले परवडतील, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. या माध्यमातून ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्यास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संदर्भात ईव्हीएमच्या विरोधात राज्यात जनआंदोलन उभा करणार असल्याचे संकेत जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता राज्यात ईव्हीएमविरुद्ध विरोधक जन आंदोलन उभी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजित पवार यांचा आघाडीवर निशाणा:म्हणाले, संविधानाबाबत खोटा नरेटीव्ह सेट केला होता; संविधानाचा सर्वांनाच आदर लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत खोटा नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो नाही. देशात सर्वच लोक हे संविधानाचा आदर करतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या खासदारांची दिल्लीत लॉबिंग:नरेंद्र मोदींकडे मागितली भेटीची वेळ, माजी खासदारांचाही समावेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. विद्यमान खासदारांसोबत या शिष्टमंडळामध्ये काही माजी खासदारांचा देखील समावेश असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी या खासदारांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा…