उल्हासनगर: एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सरकारी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एका पडीक खोलीत नेऊन नातेवाईकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या नराधम नातेवाईकावर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम नातेवाईक फरार झाला आहे.
पुण्यात बटाट्याचा पाला खाल्ल्याने ४० गाईंना विषबाधा, २० गाईंचा मृत्यू..! शेतकऱ्याचं तब्बल ५० लाखांचं नुकसान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी उल्हासनगर शहरात कुटुंबासह राहते. तर नराधम नातेवाईकही उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर तीन भागात राहतो. त्यातच पीडित मुलगी ही १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मावशीकडे काही निमित्ताने गेली होती. त्यानंतर नराधम नातेवाईकाने पिडीतेला रस्त्यात एकटीला पाहून सरकारी हॉस्पिटलच्या मागील पडीक खोलीत घेऊ गेला. विशेष म्हणजे दोघेही जवळचे नातेवाईक असल्याने पीडिता त्याच्यासोबत त्या पडीक खोलीत गेली. त्यानंतर नातेवाईकाने तिच्यावर पडीक खोलीतच बलात्कार केला.

दरम्यान, या घटनेनंतर या नराधम नातेवाईकाने पीडितेवर दोन ते तीन वेळा बलात्कार केला. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या तक्रारीवरून नराधम नातेवाईकावर भादंवि कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६ (२) (एन ) सह पोक्सोचे कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करून बलात्कार करणाऱ्या नातेवाईकाचा शोध सुरू केला.

माझी भूमिका स्पष्ट; मी माझ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणार | विजय वडेट्टीवार

या संदर्भात पोलिसांनी सांगितलले की पीडित मुलगी १६ वर्ष ७ महिन्याची असून पिडीतेवर तिच्याच जवळच्या नातेवाईकाने अत्याचार केला. त्यामुळे पीडित गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आल्याने पीडितेच्या तक्रारीवरून ३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपी नातेवाईकाला पकडण्यासाठी पोलीस पथक त्याचा शोध घेत असून गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून तो फरार असल्याचेही सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *