मुंबई: हम साथ साथ है असं म्हणणारं हॉलिवूडमधल्या जोनस कुटुंबात सध्या सगळं काही अलबेल नाहीये. बॉलिवूडची देसीगर्ल असलेली प्रियांका चोप्रा या कुटुंबाची सून आहे. तिचा संसार सुखात सुरू असला तरी, तिच्या मोठ्या जाऊबाईंनी मात्र आता या घटस्फोट घेतला आहे. प्रियांकाची मोठी जाऊ सोफी टर्नर हिनं तिचा नवरा जो जोनस याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.

खरं कर काही महिन्यांपूर्वी जोनस कुटुंब जोनस ब्रदर्स या कॉन्सर्टसाठी एकत्र आलं होतं. पण त्याच्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळं त्या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या घटस्फोटामागं अनेक कारणं आहेत. सोशल मीडियावर भलत्याच चर्चा सुरू आहेत. कोण म्हणतं की, सोफीच्या अती पार्टी करण्यामुळं जो जोनस वैतागला होता. तर कोण म्हणतंय की, सोफीला तिचं आयुष्य आता मनसोक्त जगायचं आहे, कोणत्याही नात्याचं बंधन नकोय…म्हणून तिनं हा निर्णय घेतला. तसंच आणखी एक कारणही समोर येत आहे.

असंही समोर येत आहे की, जो जोनस आणि सोफी यांच्यात मतभेद होत होते. सोफी दुसऱ्यांदा आई झाल्यानंतही त्यांच्यातले हे वाद कमी झाले नाहीत. त्यामुळं ती वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हती.
बलात्काराच्या खटल्यात अभिनेत्याला ३० वर्षांचा तुरुंगवास, निकालानंतर पीडितेला रडू कोसळलं
असंही म्हटलं जात आहे की, सोफीला सतत बाहेर फिरणं, कॉन्सर्ट्सला जाणं, फोटोशूट हे सगळं आवडत नाही, पण जो जोनसा तिला या सगळ्या गोष्टींसाठी जबरदस्ती करत असे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर सोफीला हे सगळं आवडत नव्हतं, तरी तो जबरदस्तीनं तिला कॉन्सर्ट्सला घेऊन जायचा. त्यामुळं ती इच्छा नसतानाही सगळीकडं जायची. एकदा वैतागलेल्या सोफीनं एका कार्यक्रमाला जो जोनससोबत जायला नकार दिला, तेव्हा दोघांचं भांडण झालं. त्यानंतर हा तणाव वाढतंच गेला, असं त्यांचे जवळचे मित्र सांगतात.
सुकन्या हे माझं मूळ नाव नाहीच… अभिनेत्रीने सांगितला खऱ्या नावामागचा किस्सा
सोफी आणि जो जोनस यांनी चार वर्षांच्या संसाराचा शेवट करण्याचा निर्णय घेतलाय. २०१६मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. तर २०१७मध्ये त्यांनी साखरपुडा केला. २०१९मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. दोघांनी लास वेगासमध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. सोफी आणि जो जोनस हे दोघे चिमुकल्याचे पालक आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *