मुंबई: झी मराठीवर रात्री साडेआठ वाजण्याच्या वेळेत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath New Timing) ही मालिका प्रसारित होत असे. नेहा, यश आणि छोटी परी या चौधरी कुटुंबाच्या कहाणीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र दार उघड बये’ या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित झाला आणि माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका संपणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा नव्या वेळेत ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मायरा वायकुळ तसंच संकर्षण कऱ्हाडे यांची या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या विशेष आवडीची आहे. संपूर्ण चौधरी कुटुंबीय, नेहाचे चाळीतील शेजारी यांच्यावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मात्र मालिका संपणार हे समजल्यानंतर या चाहत्यांना हिरमोड झाला होता. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्टही यातील कलाकारांनी केलेली. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. प्रेक्षकांनी ही मालिका संपण्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

हे वाचा-उषा नाडकर्णींचा फोन येताच श्रेया बुगडेची बोबडीच वळली! म्हणाली- हवं तर मार; आऊंनी असं दिलं उत्तर

या सगळ्याची दखल वाहिनी आणि निर्मात्यांनी घेतली आणि मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून ही मालिका नव्या वेळेत सुरू झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता पाहता येणार आहे. दरम्यान यामुळे आनंदित झालेली नेहा अर्थात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रेक्षकांचे आभार मानताना थकत नाही आहे. तिने लांबलचक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना धन्यवाद म्हटलं आहे.

हे वाचा-महेश भट्ट यांनी स्वत:च्याच मुलीला केलेलं Lip Kiss; पूजासोबत लग्न करण्याचीही होती इच्छा

काय म्हणाली नेहा?

प्रार्थनाने पोस्ट करत म्हटले आहे की, ‘माझ्या प्रेक्षकांचे आभार. मी नम्र आणि कृतज्ञ आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा नव्या वेळेत सुरू होत आहे. मला मनापासून आनंद झाला आहे आणि गहिवरुन आले आहे. कारण तुमच्या सर्वांमुळेच हे घडत आहे. आजपासून आणि दररोज संध्याकाळी ०६.३० वाजता फक्त झी मराठी पाहायला विसरू नका. तुमची साथ ही एक भेट आहे जी मी नेहमीच खजिन्यासारखी जपून ठेवेन.’ प्रार्थनाने केलेल्या पोस्टमध्ये ‘नेहाच्या नव्या आयुष्याची सुरुवात’ असे म्हटले आहे.


नेहाप्रमाणे परी अर्थात मायरा वायकुळ, काजल काटे, संकर्षण कऱ्हाडे यांनीही पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना या नव्या वेळेविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा नेहा-यशची रोमँटिक जोडी, समीर-शेफालीची धमाल, गोंडस परीचा अभिनय, आणि सिम्मी काकूचे कारनामे पाहायला मिळणार आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.