मुंबई : अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी आपली पत्नी सुनयनाबरोबरचा संवाद तो पोस्ट करतो. तर कधी मित्र विजू माने आणि तो मिळून काही तरी धमाल करतात. तो व्हिडिओ तो अपलोड करतो. चाहते नेहमीच कुशलच्या पोस्टची वाट पाहत असतात.

आताही कुशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय पण नेहमीसारखी ती विनोदी नाही. उलट एकदम इमोशनल आहे. विचार करायला लावणारी आहे. कुशलनं लिहिलं आहे, ‘भावनांचा जमा खर्च कोणत्याच खात्यात मोजला जात नाही. आपण किती खर्चले गेलो याचं नेमकं प्रमाण बांधता येत नाही. ते व.पू. म्हणतात ना, “खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही की त्रास होतो”. ते खरंच.’ पुढे त्यानं असंही म्हटलंय की भावनिक गुंतवणूक ही धोकादायकही ठरू शकते.

या पोस्टवर प्रतिक्रियाही खूप आल्या आहेत. श्रेया बुगडेनंही एक नंबर असं लिहिलं आहे. एकानं लिहिलंय पोस्ट वाचून हसू की रडू ते कळत नाहीय. अनेकांनी हार्ट इमोजीही टाकल्यात. टीव्ही, सिनेमाबरोबर सोशल मीडियावरही कुशल खूप लोकप्रिय आहे.

ज्येष्ठ रंगकर्मींनी समीर चौघुलेला केला फोन, ‘९३ वर्षांचा आहे रे, तुला भेटायचं होतं’ मग जे झालं ते नक्की वाचा

नेहमी विनोदी पोस्ट शेअर करणाऱ्या कुशलनं मागे एकदा एक हटके पोस्ट टाकली. तो जिथे उभा आहे, तिथे मागे हिरवळ आहे. त्यानं हिरव्या रंगाचा टीशर्टही घातला आहे. कुशल लिहितो, ‘आपल्या आजूबाजूचा हिरवा रंग आपल्यात उतरत जातो, मनाला नवी पालवी फुटते आणि हळूहळू बहरत जातो आपण. फक्त पाऊस बनून कुणीतरी “बरसत” राहणार हवं आयुष्यात.’

राम, कृष्ण आणि गांधींप्रमाणे तुम्ही… कंगनाची पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी

कुशलचं विनोदाचं टायमिंग, शारीर अभिनय हे सगळं प्रेक्षकांना लोटपोट हसवत राहतं. चला हवा येऊ द्या शोचा तर तो हुकमी एक्का आहे.

फिटनेस फ्रीक मलायका अरोरा, शॉर्ट ड्रेसमधल्या योगा लूकवरून नजर हटणार नाहीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.