नवी दिल्ली:Airtel Postpaid Plans: Airtel ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे यूजर्ससाठी अनेक वेगवेगळे प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनी स्वस्त प्रीपेड प्लान्ससोबतच शानदार Postpaid Plans देखील ऑफर करत आहे. कंपनीचे अनेक प्लान्स ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतात. एअरटेलकडे Netflix सबस्क्रिप्शन ऑफर करणे इतरही प्लान्स उपलब्ध आहेत. Airtel व्यतिरिक्त Jio देखील आपल्या काही प्लान्समध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करणाऱ्या एअरटेलच्या अशाच काही शानदार पोस्टपेड प्लान्सविषयी जाणून घेऊया.

वाचा: WhatsApp वापरताना अचानक झाला Oppo च्या स्मार्टफोनचा स्फोट, कंपनी म्हणते…

Airtel चा १,१९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे १,१९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. यामध्ये एक स्टँडर्ड आणि कुटुंबासाठी दोन अ‍ॅड ऑन कनेक्शन दिले जातात. यात नियमित सबस्क्राइबर्सला १५० जीबी डेटा मिळतो. तर इतर दोन यूजर्सला ३० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची देखील सुविधा मिळेल. याशिवाय, देशभरात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा देखील फायदा मिळतो. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइल, ६ महिन्यांसाठी Amazon Prime मेंबरशिप आणि नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन मोफत मिळते. याशिवाय, विंक प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

वाचा: विराट कोहली वापरतो ‘हा’ शानदार स्मार्टफोन, पुढील महिन्यात भारतात होणार लाँच

Airtel चा १,५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

Airtel कडे १,५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २५० जीबी डेटा दिला जातो. तर प्रत्येक अ‍ॅड ऑन यूजर्सला ३० जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल. यामध्ये तीन अ‍ॅड ऑन प्लान्स निवडता येतात. यासोबतच, २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. तसेच, १ वर्षासाठी Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन, ६ महिन्यांसाठी Amazon Prime मेंबरशिप आणि १ महिन्यासाठी Netflix चे सबस्क्रिप्शन दिले जाते.

वाचा: शानदार डिस्प्ले आणि पॉवरफुल बॅटरीसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट फोन्स, किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.