नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या सणाला सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत आटा’ या नावाने एक ब्रँड देशभरात लॉन्च केला आहे. या गव्हाच्या पिठाची २७.५० रुपये किलो दराने विक्री सुरू केली आहे. नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशभरातील ८०० मोबाईल व्हॅन आणि २,००० हून अधिक दुकानांमधून ‘भारत आटा’ची विक्री केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या ३६-७० रुपये प्रति किलोच्या बाजारभावापेक्षा गुणवत्तेवर आणि स्थानानुसार अनुदानित दर कमी आहे. फेब्रुवारीमध्ये, सरकारने किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत काही दुकानांमध्ये या सहकारी संस्थांमार्फत १८,००० टन ‘भारत आटा’ची २९.५० रुपये प्रति किलो दराने प्रायोगिक विक्री केली.

राजधानी दिल्लीत आता प्रत्येक श्वासात आहे विषारी वायू; तज्ज्ञांच्या इशाऱ्याने खळबळ
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘भारत आटा’च्या १०० मोबाईल व्हॅनला हिरवा कंदील दाखवून केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल म्हणाले की, ‘आम्ही पिठावर अनेक चाचण्या घेतल्या आणि त्यात यश आल्याने आम्ही ही सेवा लोकांपर्यंत पोहोचवली आहे. २७.५० रुपये प्रति किलो दराने देशात हे पिठ सर्वत्र उपलब्ध आहे.

ते म्हणाले की, ‘चाचणीच्या वेळी गव्हाच्या पिठाची विक्री कमी होती. कारण त्याची काही स्टोअरमधूनच किरकोळ विक्री होत होती. यामुळे, यावेळी उत्पादनाची विक्री चांगली होईल. कारण देशभरातील तीन एजन्सीच्या ८०० मोबाईल व्हॅन आणि २,००० दुकानांमधून उत्पादनाची विक्री केली जाणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *