नवी दिल्ली : टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये आता एक नवीन नियम आणण्यात आला आहे. या नियमानुसार संघाला पाच धावांचा दं भारावा लागू शकतो. हा नियम नेमका आहे तरी काय, याची माहिती आता समोर आली आहे.

वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये वेळ महत्वाचा असतो. प्रत्येक तासामध्ये किती षटकं झाली पाहिजे, याता नियम यापूर्वीच बनवला गेला आहे. जर एखाद्या संघाला नियमित वेळत ही षटकं टाकता आली नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होत होती. पण त्यामुळे जास्त फरक पडत नव्हता. त्यामुळे आता आयसीसीने एक नवीन नियम आणण्याचे ठरवले आहे. हा नियम वनडे आणि टी-२० सामन्यातील वेळेसाठीच बनवण्यात आलेला आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये वनडे आणि टी-२० सामने नियोजित वेळेत संपत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा नियम आता बनवण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे नवीन नियम जाणून घ्या…
आयसीसीच्या या नवीन नियमात वेळ सर्वात महत्वाची असेल. जो संघ गोलंदाजी करत आहे, त्याच्या संदर्भात हा नियम बनवण्यात आला आहे. काही वेळेला दोन षटकांमध्ये जास्त वेळ जातो, पण त्यामुळे सामन्याला उशिर होते. त्यामुळे आता दोन षटकांमध्ये जर एका मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला तर त्याची नोंद घेतली जाणार आहे. जर ही गोष्ट तीन वेळा मैदानात घडली तरी त्या संघाला पाच धावांचा दंड असेल. त्यामुळे आता जर दोन षटकांमध्ये कर्णधाराने किंवा कोणत्याही खेळाडूने एका मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवला तर त्याची शिक्षा संपूर्ण संघाला मिळणार आहे. त्यामुळे या नियमाचे पालन सर्वांना करावे लागणार आहे.

नवीन नियम कधीपासून लागू होणार…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला २३ नोव्हेंबर सुरुवात होणार आहे. हा नवीन नियम डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुढच्या महिन्यापासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा नियम प्रयोगिक तत्वावर असेल.

काँग्रेस नेते एकत्र बसून घेतायेत IND vs AUS फायनल सामन्याचा आनंद

या नवीन नियामाने क्रिकेटमध्ये किती फरक पडतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *