नवी दिल्ली: Acer Smart TV: स्मार्ट टीव्ही हीआजच्या काळात प्रत्येक घराची गरज बनली आहे. लोक त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार वेगवेगळ्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह स्मार्ट टीव्ही खरेदी करतात. जर तुम्ही ३२ -इंच ते ६५-इंच स्क्रीन आकारात स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल, तर हा फेस्टिव्ह सिझन एक उत्तम संधी असू शकतो. स्मार्ट टीव्ही ब्रँड Acer ने एक नवीन स्मार्ट टीव्ही सीरिज लाँच केली असून सीरिज स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे .

वाचा: WhatsApp Users ना मिळणार एडिट बटण ? फीचरचा काय फायदा होणार जाणून घ्या

किती आहे किंमत ?

अलीकडेच Acer द्वारे दोन H आणि S स्मार्ट टीव्ही मालिका लाँच करण्यात आल्या आहेत. यात ३२ इंच, ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंच आणि ६५ इंच स्मार्ट टीव्ही सादर करण्यात आले आहेत. हा स्मार्ट टीव्हीचा नवीन प्रीमियम लाइनअप आहे. जो Android 11 आधारित सपोर्टसह येईल. यात अँड्रॉइड टीव्हीच्या एच आणि एस मालिका समाविष्ट आहेत. हे स्मार्ट टीव्ही डॉल्बी अॅटमॉस आणि व्हिजन सारख्या Next Generation Feature सह सिनेमा पाहण्याचा अनुभव देतात.

वाचा: फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खूप खर्च करण्याची नाही गरज, Xiaomi 12 Pro 5G वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ

या स्मार्ट टीव्हीमध्ये हाय-फाय प्रो ऑडिओ सिस्टम सपोर्ट उपलब्ध असेल. तसेच, ६० W साउंड आउटपुट उपलब्ध असेल. UHD स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ३ वर्षांची वॉरंटी दिली जाईल. नवीन स्मार्ट टीव्ही लाइनअप अंगभूत स्मार्ट ब्लू लाइट रिडक्शन टेक्नॉलॉजी, एचएलजी सपोर्टसह HDR 10+ आहे. याशिवाय, सुपर ब्राइटनेस, ब्लॅक लेव्हल ऑगमेंटेशन, 4K अपस्केलिंग 2 वे ब्लूटूथ, ड्युअल वाय-फाय बँड सपोर्ट देण्यात आला आहे. एसर टीव्हीच्या ३२ इंच एचडी मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये आहे.

त्याच स्मार्ट टीव्हीचे ४३ इंच UHD मॉडेल २९,९९९ रुपयांना मिळेल. तर, ५०-इंचाच्या UHD मॉडेलची किंमत ३४,९९९ रुपये आहे. स्मार्ट टीव्हीचे 55 UHD मॉडेल ३९,९९९ रुपयांना मिळते. Acer TV च्या टॉप मॉडेल म्हणजेच ६५ इंच UHD स्मार्ट टीव्हीची किंमत ६४,९९९ रुपये आहे. हे सर्व स्मार्ट टीव्ही फेस्टिव्ह सिझनमध्ये विशेष प्रास्ताविक किमतीत खरेदी करता येतील.

वाचा: अधिक कॉल्स करणाऱ्यांसाठी Airtel चा बेस्ट प्लान, वर्षभर अनलिमिटेड कॉल्ससह मिळणार २४ GB डेटा, पाहा किंमतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.