म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे बॅंड स्टॅंड या ठिकाणी एका चिठ्ठीतुन धमकाविल्यानंतर अभिनेता सलमान खान याला आता ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. ईमेलमधील मजकूरात दिल्ली येथील तुरुंगात असलेल्या गुंड बिश्नोईच्या नावाचा उल्लेख असून त्याची दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत दाखवण्यात आली होती. या मुलाखतीचा हवाला देत सलमानला धमकाविण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या धमक्यांमुळे काही दिवसांपूर्वी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याबरोबरच त्याला बंदुकीचा परवानाही देण्यात आला होता.

जून २०२२ मध्ये सलीम खान हे वांद्रे बॅंड स्टॅंड येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असताना त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. या चिठ्ठीमध्ये ‘आपकाही जल्द मुसेवाला होगा’ असे सलीम आणि सलमान खान यांना उद्देशून लिहिण्यात आले होते. या धमकीमागे गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा हात असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सलमान याच्या कार्यालयामध्ये एक मेल धडकला. एका कर्मचाऱ्याच्या ईमेल आयडीवर पाठविण्यात आलेल्या या मेलमध्ये ‘गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से’ असे नमूद करण्यात आले आहे. अगली बार बडा झटका देंगे अशी धमकी या ईमेलमधून देण्यात आली आहे. याची दखल घेत सलमानच्या कर्मचाऱ्याने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून इमेल पाठविणारा व्यक्ती, गोल्डी भाई (गोल्डी बरार) आणि लॉरेन्स बिश्नोई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पत्नी प्रिया यांना दिलेली पहिली भेट कोणती? स्वतः म्हणालेले- मी तर…
ईमेलमधील धमकीचा मजकूर
“गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने. अगर नाही देखा तो बोल देना देख लेगा. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे” असा इमेल rohitgarg<rg6338615@gmail.com> या आयडीवरून पाठविण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *