नवी दिल्ली:राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने आतापर्यंतची सर्वात मोठा छापा टाकला आहे. देशातील विविध राज्यात टाकण्यात आलेल्या छाप्यात NIAकडून १००हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. NIAने PFIशी संबंधित केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसमसह १२ राज्यात छापे टाकले आहेत. NIA पाठोपाठ ईडीने देखील पीएफआयच्या अनेक ठिकणी छापे टाकले आहेत.

तपास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या या कारवाईत आतापर्यंत १०६ जणांना अटक झाली आहे. NIA आणि ईडीने PFIच्या ठिकाणावर छापे सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने PFIशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. मंजेरीमध्ये PFIचा चेअरमन ओमा सालेम यांच्या ठिकाणावर देखील छापे टाकण्यात आलेत. या छाप्यात ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओमा सलेमसह पीएफआयच्या केरळ राज्याचा प्रमुख मोहम्मद बशीर, राष्ट्रीय सचिव वीपी नजरुद्दीन आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी कोया यांना ताब्यात घेतले आहे.

वाचा- मोठी बातमी : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास BMCने ठाकरे आणि शिंदे गटालाही परवानगी नाकारली

१२ राज्यात NIAचे छापे

NIA आणि ईडीने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बिहार, नवी दिल्ली आणि आसाम यासह १२ राज्यात छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात देखील २० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. मध्य प्रदेशात इंदुरमध्ये पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकलेत, तर उज्जेनमधून ४ जणांना ताब्यात घेतले आहे. बिहारमधील पूर्णियामध्ये देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेरर फंडिग प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

वाचा- क्रिकेटमध्ये २३ वर्षानंतर असे घडले; भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला

आंध्र प्रदेशमध्ये जोरदार विरोध

वाचा- मुंबई, पुणे, भिवंडी, मालेगाव, औरंगाबादमध्येED आणि NIA चे छापे; २० जणांना अटक

तेलंगणामध्ये ANIने हैदराबाद आणि चंद्रयानगुट्टा येथील PFIचे कार्यालय सील केले आहे. तामिळनाडूत एनआय आणि ईडीने कार्यालय सील केले, मात्र या कारवाईनंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यानी विरोध सुरू केला.

कोणत्या राज्यात किती ठिकाणी छापे
केरळ- २२
महाराष्ट्र- २०
कर्नाटक- २०
आंध्र प्रदेश- २०
आसाम- ५
दिल्ली- ३
मध्य प्रदेश-४
पुड्डुचेरी- ३
तामिळनाडू- १०
उत्तर प्रदेश- ८
राजस्थान-२Source link

Leave a Reply

Your email address will not be published.