पुणे: आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि आपण जे कागदपत्रे गोळा केलेले आहेत, ती नेमकी कोणती आहेत? त्यांच्याकडे किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना केले आहे.

एएनआय अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील विविध राज्यात आज छापेमारी केली. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १०० लोकांना ताब्यात घेतलं गेलंय. देशभरातील ११ राज्यांत एनआयएने ही छापेमारी केली आहे. देशामध्ये घडणाऱ्या दंगली असो वा हिंसाचार… या सगळ्या घटनांमध्ये लोकांची डोकी भडकवणारी संघटना म्हणून पीएफआयकडे बोट दाखवलं जातं. याच पीएफआयवर आज सर्जिकल स्ट्राईक झालाय.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी पवार दोघांना नडले, पण निवडणुकीत पडले, नेमकं काय घडलं होतं? वाचा…
आंबेडकर म्हणाले, छापेमारी का केली? पुरावे द्या!

या सगळ्या कारवाईवर बोलताना अॅड आंबेडकर म्हणाले, “तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? हे आपण येत्या २४ तासांत लोकांसमोर मांडा. तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असं असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते”

देशभरात एनआयएची छापेमारी

एनआयएने आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू तसेच अन्य काही राज्यात छापेमारी केलीये. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये लोकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच बेकायदेशीर कृत्य करणे अशा विविध आरोपांखाली PIF च्या १०० सदस्यांना अटक करण्यात आलं आहे. मुंबई पुण्यातही एनआयने छापेमारी केली आहे.

कोण उद्धवजी? कोण उद्धव ठाकरे? उद्धवss… नारायण राणेंची पत्रकाराशी हुज्जत, नेमकं काय घडलं? बघा…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.