बीड : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच वाहनाला कट मारला. यावेळी थोडक्यात अपघात टळला असला तरी या घटनेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगत आहे. सदर वाळू माफियाचा काही किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतरही तो हाती लागला नाही. मात्र त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना फोन करून या टिप्परचालकाला तात्काळ अटक करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आणि त्यानंतर या चालकाच्या हाती बेड्या पडल्या आहेत.बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या आपल्या कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या होत्या. मात्र काम आटोपण्यास उशीर झाल्याने त्यांना रात्री निघण्यासही उशीर झाला. छत्रपती संभाजीनगर ते बीड प्रवास करत असताना रात्री उशिरा पाडळसिंगी भागात जिल्हाधिकाऱ्यांची गाडी आली असता मागून आलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या विनानंबर टिप्परने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या टिप्परचा काही किमी अंतरावर पाठलाग देखील केला. मात्र टिप्पर चालकाने मागील बाजूची वाळू रस्त्यावर ओतण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर पडत असलेल्या वाळूतच जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडकली. त्या संधीचा फायदा घेत टिप्पर चालकाने भरधाव वेगात पलायन केलं.

बीड नगरपालिकेत राडा; तीन महिन्यांचं वेतन रखडलं; महिला कामगारांनी कर्मचारी अन् अधिकाऱ्यानां कोंडलं

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर

या सगळ्या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार यांना फोन करत माहिती दिली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे चालक आणि बॉडीगार्ड यांच्या फिर्यादीवरून या टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, हे वाळू माफिया जर जिल्हाधिकाऱ्यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांना घाबरत नसतील तर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच महसूल प्रशासनाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर वेळीच कडक कारवाई केली असती, तर अशा घटना टळल्या असत्या, अशी भावनाही स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *