नितीन गडकरींचे ‘लाडकी बहीण’ वरील विधान चर्चेत:म्हणाले – अनुदानासाठी सरकारच्या भरोशावर राहू नका, कारण योजनेला पैसे द्यावे लागतात

नितीन गडकरींचे ‘लाडकी बहीण’ वरील विधान चर्चेत:म्हणाले – अनुदानासाठी सरकारच्या भरोशावर राहू नका, कारण योजनेला पैसे द्यावे लागतात

महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षाकडून या योजनेवर टीका होत असताना आता केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. गुंतवणुकदारांनी अनुदानासाठी सरकारच्या भरोशावर राहू नये, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात गुंतवणुकदारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकार हे विष कन्या असते. मग ते सरकार कोणाचेही असु द्या. ज्यांच्यासोबत जाते त्यांना ते बुडवते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सरकारला बाजूला ठेवावे. तुम्ही सरकारच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला सरकारकडून अनुदान घ्यायचे आहे तर घ्या. अनुदान घ्यायला काहीच हरकत नाही, मात्र अनुदान मिळेल की नाही, याची काही शाश्वती नसते. अनुदान मिळेल की नाही याची शाश्वती नाही नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मला एकाने सांगितले की, साडेचारशे कोटी रुपयांचे अनुदान आले आहे. पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटले की, तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. ते म्हणाले, पैसे मिळणार की नाही? मी म्हटले, जेव्हा येतील तेव्हा मिळतील. ते म्हणाले, अनुदानाचे पैसे मिळतील का‌? मी म्हणालो, याची शाश्वती नाही. कारण लाडक्या बहीण योजनेलाही पैसा द्यावा लागतो, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची आता चांगलीच चर्चा होत आहे. जानेवारीत सरकारच्या तिजोरीत पैसा राहणार नाही दरम्यान, महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेहमीच टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या योजनेवरून सरकारला इशारा दिला होता. योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले होते. तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला होता. निवडणुकीच्या आधी योजना आणणे म्हणजे महिलांना टेबलाखालून लाच देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता.

​महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षाकडून या योजनेवर टीका होत असताना आता केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. गुंतवणुकदारांनी अनुदानासाठी सरकारच्या भरोशावर राहू नये, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात गुंतवणुकदारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकार हे विष कन्या असते. मग ते सरकार कोणाचेही असु द्या. ज्यांच्यासोबत जाते त्यांना ते बुडवते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सरकारला बाजूला ठेवावे. तुम्ही सरकारच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला सरकारकडून अनुदान घ्यायचे आहे तर घ्या. अनुदान घ्यायला काहीच हरकत नाही, मात्र अनुदान मिळेल की नाही, याची काही शाश्वती नसते. अनुदान मिळेल की नाही याची शाश्वती नाही नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मला एकाने सांगितले की, साडेचारशे कोटी रुपयांचे अनुदान आले आहे. पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटले की, तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. ते म्हणाले, पैसे मिळणार की नाही? मी म्हटले, जेव्हा येतील तेव्हा मिळतील. ते म्हणाले, अनुदानाचे पैसे मिळतील का‌? मी म्हणालो, याची शाश्वती नाही. कारण लाडक्या बहीण योजनेलाही पैसा द्यावा लागतो, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची आता चांगलीच चर्चा होत आहे. जानेवारीत सरकारच्या तिजोरीत पैसा राहणार नाही दरम्यान, महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेहमीच टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या योजनेवरून सरकारला इशारा दिला होता. योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले होते. तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला होता. निवडणुकीच्या आधी योजना आणणे म्हणजे महिलांना टेबलाखालून लाच देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment