जातीचे विष पसरवणारे लोकांना नको झालेत:शिर्डी मतदारसंघात द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, विखेंचा नीतेश राणेंना घरचा आहेर
भाजप आमदार नीतेश राणे यांनी सकल हिंदू समाज मोर्चाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्रमक भाषण केले होते. त्यांच्या वादग्रस्त भाषणानंतर त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी नीतेश राणे यांना घरचा आहेर दिला आहे. सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता या आक्रमक भाषणाला विरोध दर्शवला आहे. शिर्डीत कोणी वातावरण बिघडवले तर माझ्याशी गाठ आहे, असा इशारा सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. हिंदू मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. मात्र सध्या जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नको झाले आहेत. शिर्डी मतदारसंघात जाती-धर्मात द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. सुजय विखे पाटलांनी बोलताना कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार नीतेश राणे यांनी नगर आणि श्रीरामपूर येथे आक्रमक भाषण केले होते. त्यामुळे सुजय विखे पाटलांचा रोख हा राणेंवरच असल्याचे दिसते. पुढे बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्वधर्म समभावचा संदेश दिला आहे आणि तो संदेश आपल्याला देशभरात पोहोचवायचा आहे. सध्या जनतेच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे नाही. काय म्हणाले होते नीतेश राणे? महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांग्लादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारच्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे नगर आणि श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार नीतेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केले आहे. नीतेश राणे म्हणाले, महंत रामगिरी महाराज यांच्याविषयी कोणी काही केले तर तुमच्या मशिदीत घुसून एकेकाला मारून काढेल. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.