मुंबई: भारत आणि न्यूजीलंडमधील विश्वचषकाच्या २०२३ चा सेमीफायनल सामना १५ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्याआधीच भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. त्याच झालं असं की, भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात रॉड टकर आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानात अंपायर म्हणून काम पाहतील. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात नितीन मेनन आणि रिचर्ड कॅटलब्रो ही भूमिका पार पाडतील. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल.

२०१९च्या विश्वचषकातही हेच दोन अंपायर्स

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या २०१९ मधील विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यातही इलिंगवर्थ मैदानी पंच होते. ओल्ड ट्रफेड मैदानावर झालेला हा सामना वातावरणातील बदलांमुळे दोन दिवस खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. टकर यांनी या सामन्यात थर्ड अंपायरची भूमिका निभावली होती. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा सेमीफायनल सामना टकर यांच्यासाठी १०० वा एकदिवसीय सामना असेल. तसेच या सामन्यात थर्ड अंपायर म्हणून विल्सन, तर चौथे अंपायर म्हणून एड्रियन होल्डस्टॉक हे काम पाहतील. त्यामुळे भारताच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याचा २०१९च्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरूद्धचा सामना भारतीय चाहते अद्यापही विसरु शकले नाहीत.

भारत व न्यूझीलंडचा सेमी फायनलचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्येही इलिंगवर्थ अंपायर

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या विजेतेपदाच्या सामन्यासाठीही इलिंगवर्थच पंच होते. या सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण असे असले तरी यंदाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही इलिंगवर्थच अंपायर होते तरीही भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.

सेमीफायनल सामन्यांसाठी हे आधिकारी

पहिला सेमीफायनल सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, १५ नोव्हेंबर, मुंबई

  • मैदानी अंपायर: रिचर्ड इलिंगवर्थ आणि रोड टकर
  • तिसरा अंपायर: जोएल विल्सन
  • चौथा अंपायर: एड्रियन होल्डस्टॉक
  • मैच रेफरी: एंडी पाइक्राफ्ट

दुसरा सेमीफायनल:ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १६ नोव्हेंबर, कोलकत्ता

  • मैदानी अंपायर: रिचर्ड केटलब्रो आणि नितीन मेनन
  • तिसरा अंपायर: ख्रिस गफानी
  • चौथा अंपायर: मायकल गफ
  • मैच रेफरी: जवागल श्रीनाथ

केन विल्यमसनने दिले भारताला ओपन चॅलेंज, म्हणाला तुम्ही काहीही केलं तरी आम्ही कोणालाही…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *