नवी दिल्ली:Nothing Phone (1) Look: टेक्नोलॉजी कंपनी Nothing च्या पहिल्या वहिल्या स्मार्टफोनची गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कंपनी लवकरच आपल्या नवीन फोनला लाँच करणार आहे. आता कंपनीने फोनचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये कंपनीने डिव्हाइसच्या डिझाइनबाबत माहिती दिली आहे. फर्स्ट लूकमध्ये कंपनीने Nothing Phone (1) ची बॅक पॅनेल डिझाइन दाखवली आहे. एका ट्विटर पोस्टमध्ये Nothing ने अपकमिंग स्मार्टफोन Phone (1) चे रियर साइड दाखवली आहे, कंपनीने फोटो शेअर करत लिहिले की, हा बोल्ड आणि वॉर्म आहे. फोनची अधिक माहिती १२ जुलैला समोर येईल. या फोनचे डिझाइन यूजर्सला देखील आवडत आहे.

याआधी कंपनीने Nothing Phone (1) च्या रियर डिझाइनला टीझ केले होते. याबाबत अनेक रेंडर्स देखील समोर आले होते. परंतु, आता अखेर कंपनीने याच्या रियर डिझाइनचा खुलासा केला आहे. याआधी कंपनीचे संस्थापक Carl Pei यांनी माहिती दिली होती की, भारतात विक्री होणाऱ्या Phone (1) चे उत्पादन देशातच होईल. Carl Pei हे लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी OnePlus चे सह-संस्थापक आहेत. Nothing Phone 1 क कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल. डिव्हाइस प्रामुख्याने प्रीमियम स्मार्टफोन्स यूजर्सला टार्गेट करेल.

वाचा: Smartphone Offers: Samsung चा १३ हजारांचा बेस्टसेलर फोन मिळतोय फक्त ९,४९९ रुपयात; पाहा ऑफर

फोन यूजर्सला खूपच सिंपल इंटरफेस देईल. रिपोर्टनुसार, Nothing Phone 1 हा आयफोनला टक्कर देईल. याआधी कंपनीने Nothing ear (1) इयरबड्सला देखील लाँच केले होते. हे कंपनीचे पहिले प्रोडक्ट होते. हटके डिझाइनमुळे या इयरबड्सची विशेष चर्चा झाली होती. आता अशीच चर्चा Nothing Phone (1) ची होत आहे. हा फोन यूजर्सच्या पसंतीस उतरतो की नाही, हे लाँचिंगनंतरच समजू शकेल. रिपोर्टनुसार, या फोनला २ हजार रुपयात प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, फोन १२ जुलैला लाँच होणार आहे. लाँचनंतरच फोनच्या अधिकृत किंमत आणि फीचर्सचा खुलासा होईल.

वाचा: आता Android मधून iPhone मध्ये ट्रान्सफर होणार WhatsApp चॅट, मार्क झुकरबर्गने केली घोषणा

वाचा: Father’s Day ला वडिलांना गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे ‘हा’ स्मार्टफोन; किंमत कमी फीचर्स जबरदस्तSource link

Leave a Reply

Your email address will not be published.