मुंबई : मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर नुपुर शर्मा चर्चेत आल्या. भाजपनं त्यांना पक्षातून काही महिन्यांसाठी निलंबितही केलं. नुपुर यांच्या वक्तव्यानंतर देशभरात आंदोलनं झाली. त्यांच्या विरोधात लोक रस्त्यावरही उतरले. यावर बाॅलिवूड सेलिब्रिटींनीही आपली मतं मांडली. अभिनेत्री कंगना रणौतनं नुपुर शर्मा यांचं समर्थन केलं. नुकतंच क्रिकेटर गौतम गंभीरनंही ट्विटरवर यावर भाष्य केलं आहे. त्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली आहे.

अभिनेता संदीप पाठकचा जबरा फॅन, चाहत्यानं असं काही केलं की…

गौतम गंभीरनं ट्वीट करून लिहिलं की, माफी मागितलेल्या महिलेबद्दल अख्ख्या देशात रागाची, तिरस्काराची भावना आहे. त्यांचा जीव घेण्याची धमकी दिली जात आहे. यावर तथाकथित धर्मनिरपेक्ष उदारमतवादी मौन बाळगून आहेत. हे ट्वीट स्वरानं शेअर केलं आहे.


गौतम गंभीरवर भडकली स्वरा

स्वरा भास्कर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सडेतोडपणे आपली मतं मांडत असते. स्वरानं गौतम गंभीरच्या ट्वीटचा स्क्रीनशाॅट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलं, यांना बुलडोझरचा आवाज ऐकू आला नाही का?

स्वरा भास्कर पोस्ट

स्वरा पोस्ट

काही दिवसांपूर्वी स्वरानं आपल्या स्टोरीत म्हटलं होतं, या काळात भारतात राहणं म्हणजे सतत क्रोधाचा अनुभव करणं. मध्यंतरी एका परफ्युमच्या जाहिरातीवरून खूप गदारोळ उडाला होता. त्यावर स्वरा भास्करही व्यक्त झाली होती. तिनं ट्वीट करत संताप व्यक्त केला होता. तिनं लिहिलं की, ‘ज्या कंपनीचं हे परफ्युम आहे त्यांनी केलेली जाहिरात अत्यंत घृणास्पद आहे. हे कल्पनेच्या पलिकडचे आहे.’

कतरिना नाही या अभिनेत्रीसह रोमान्स करतोय विकी कौशल, रोमँटिक Photos लीक

स्वरा भास्कर शीर कोरमा सिनेमात दिसली होती. त्यात शबाना आझमी आणि दिव्या दत्ता होती. आपल्या कामाबद्दल स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

असा शूट झाला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधला हा सीनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.