ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा:म्हणाले – मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्या राजेश टोपे, रोहित पवारांसह 50 उमेदवारांना पाडणार

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा:म्हणाले – मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्या राजेश टोपे, रोहित पवारांसह 50 उमेदवारांना पाडणार

आम्ही आज रोजी 50 उमेदवार पडण्याची यादी तयार केली आहे. 50 उमेदवार कोणते पाडायचे हे आमचं ठरलं आहे. ज्यांनी मनोज जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पडणार असल्याचे हाके म्हणाले. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार आहोत, असे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, मुख्यमंत्री हे एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार आहेत. ओबीसींनी यांच्या तुकड्यावर जगू नये 50 ते 60 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींची भीती शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपला कधी बसेल? असा सवाल हाकेंनी बोलताना उपस्थित केला आहे. फडणवीसांनी ऑडिट करावे लक्ष्मण हाके म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की 1 लाख मराठा बांधवांना रोजगार दिला. पण एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम एकनाथ शिंदे, रोहित पवार करत आहेत. तर उपमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करण्यात येत आहे.या गोष्टीचे देवेंद्र फडणवीसांनी ऑडिट करायला हवे. शरद पवारांकडे मतांसाठी दुसरा विषय नाही लक्ष्मण हाके म्हणाले की, आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यायला हवी हे काही रेशनचे दुकान नाही. आरक्षण मिळाल्यानंतर पुढच्या पिढीचे भले होणार असे नाही, प्रत्येक घरात कलेक्टर होणार असे नाही. शरद पवार यांना मतदान मागण्यासाठी दुसरे काही न उरल्याने हे सर्व सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मतेंवर कारवाई करा प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की,मी ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय.ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी मते या तरुणाचे फोटो अनेक नेत्यांसोबत आहेत त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

​आम्ही आज रोजी 50 उमेदवार पडण्याची यादी तयार केली आहे. 50 उमेदवार कोणते पाडायचे हे आमचं ठरलं आहे. ज्यांनी मनोज जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पडणार असल्याचे हाके म्हणाले. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार आहोत, असे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, मुख्यमंत्री हे एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार आहेत. ओबीसींनी यांच्या तुकड्यावर जगू नये 50 ते 60 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींची भीती शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपला कधी बसेल? असा सवाल हाकेंनी बोलताना उपस्थित केला आहे. फडणवीसांनी ऑडिट करावे लक्ष्मण हाके म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की 1 लाख मराठा बांधवांना रोजगार दिला. पण एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम एकनाथ शिंदे, रोहित पवार करत आहेत. तर उपमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करण्यात येत आहे.या गोष्टीचे देवेंद्र फडणवीसांनी ऑडिट करायला हवे. शरद पवारांकडे मतांसाठी दुसरा विषय नाही लक्ष्मण हाके म्हणाले की, आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यायला हवी हे काही रेशनचे दुकान नाही. आरक्षण मिळाल्यानंतर पुढच्या पिढीचे भले होणार असे नाही, प्रत्येक घरात कलेक्टर होणार असे नाही. शरद पवार यांना मतदान मागण्यासाठी दुसरे काही न उरल्याने हे सर्व सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मतेंवर कारवाई करा प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की,मी ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय.ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी मते या तरुणाचे फोटो अनेक नेत्यांसोबत आहेत त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment