रिओ डी जनेरो: ब्राझीलमध्ये एक अजब घटना घडली आहे. निम्मा कुत्रा आणि निम्मा कोल्हा असलेला जगातील पहिला प्राणी ब्राझीलमध्ये सापडला आहे. त्याला असं नाव देण्यात आलं आहे. एका कारसमोर आल्यानं प्राणी जखमी झाला. त्यामुळे असा प्राणी जगात अस्तित्वात असल्याचं पहिल्यांदाच समोर आलं. डॉग्जिम मादी असून आता संशोधक याबद्दल अधिक माहिती गोळा करत आहेत.डॉग्जिमचा जेनेटिक तपशील मिळवण्याचं काम सुरू आहे. या प्राण्याचा जन्म पॅम्पास कोल्हीणीच्या पोटातून झाला. तर डॉग्जिमचा पिता पाळीव कुत्रा आहे. डॉग्जिमच्या शरीरात कुत्रा आणि कोल्हीणीचे जिन्स आहेत. त्यामुळे त्याच्या शरीराचा आकार, रंग आणि अन्य अनेक गोष्टी कुत्रा आणि कोल्हीणीसारख्या आहेत. त्याचं वर्तनदेखील दोन्ही प्राण्यांसारखं आहे.डॉग्जिमचे कान टोकदार आहेत. ते आकारानं मोठे आहेत. क्रॉसबीड असूनही हा प्राणी माणसांना घाबरत नाही. डॉग्जिम माणसांशी जिव्हाळ्यानं वागते. माणसांच्या कुशीत आनंदानं बसते. थोपटल्यावर खेळू लागते. शास्त्रज्ञांना तिला खाऊ घातलं. पण तिनं ते खाल्लं नाही. पण जिवंत उंदिर मात्र आवडीनं खाल्ले.डॉग्जिम कुत्र्यासारखी भुंकते. काही वेळ ती खेळण्यांसोबत खेळली. पण तिचं वर्तन, चालचलन पूर्णत: कोल्हासारखी आहे. डॉ. फ्लाविया फरारी यांनी तिच्यावर उपचार केले. हा जीव अद्भुत आहे. हायब्रिड असूनही ती कमाल आहे. जंगली कुत्र्यांमध्ये आक्रमकता असते. पण त्याचा लवलेशही डॉग्जिममध्ये नाही. ती अतिशय लाजाळू आहे, अशी माहिती फरारी यांनी दिली.डॉग्जिम सुरुवातीला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांपासून चार हात लांब राहत होती. ती फारशी जवळ येत नव्हती. पण हळूहळू ती डॉक्टरांमध्ये मिसळली. कोल्हीण आणि कुत्र्याचं क्रॉस ब्रीडिंगची ही जगातील पहिलीच घटना आहे. डॉग्जिममध्ये ७६ क्रोमोझोम्स आहेत. कोल्हीण आणि कुत्र्यात अनुक्रमे ७४ आणि ७८ क्रोमोझोम्स असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *