बुढ्ढे, तेरेको ड्युटी करनी आती क्या?:छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरची पोलिसांनाच आरेरावी, गुन्हा दाखल

बुढ्ढे, तेरेको ड्युटी करनी आती क्या?:छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरची पोलिसांनाच आरेरावी, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर येथे एका श्रीमंत व्यक्तीची मुजोरी पाहायला मिळाली. कुणाल बाकलीवाल असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गाडी अडवली तेव्हा याने मला ओळखत नाही का? सगळ्यांना सस्पेंड करतो, अशी धमकी दिली. कुणाल बाकलीवाल हा व्यवसायाने बिल्डर आणि लँड डेव्हलपर आहे. तसेच याचे राजकीय नेत्यांशी देखील जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. काळ्या डिफेंडर गाडीतून जात असताना वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवत नियमांचे पालन करण्यास सांगितले. यावर त्याने हिंदी भाषेतून आरेरावी करण्यास सुरुवात केली. बुढ्ढे, तेरेको ड्युटी करनी आती क्या? असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्याने, “साहेबांना बोल, मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो, अशी धमकी दिली. दरम्यान, कुणाल बाकलीवालचा हा मुजोरपणा एका पोलिस कर्मचाऱ्याने रेकॉर्ड केला आहे. हे लक्षात आले तरी देखील त्याचे अर्वाच्च भाषेत बोलणे सुरूच होते. तसेच जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का? असे म्हणत त्याने कोणाला तरी फोन लाऊन पोलिसांकडे दिला. कुणाल बाकलीवालचा हा माज बघून पोलिसांनी त्याला गाडीतून खाली उतरवत थेट क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी देखील कुणाल बाकलीवालच्या जागी सामान्य माणूस असता तर पोलिसांनी देखील असेच ऐकून घेतले असते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बाकलिवालच्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.राजकीय ओळख आणि पैशाच्या माजावर पोलिसांना गृहित धरणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment