भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून याला कोरोनाची चौथी लाट (Covid 4th wave) म्हणून पाहिले जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 8,822 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 43,245,517 झाली आहे. 15 लोकांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या 524,792 वर पोहोचली आहे. सध्या देशात 53,637 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. गेल्या एका आठवड्यात देशात 55,235 नवीन रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटशी संबंधित काही प्रकरणे आढळून आली आहेत. मुंबईत ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BA.4 चे तीन आणि ओमिक्रॉन सब-व्हेरियंट ba.5 ची एक केस आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. ओमिक्रॉनचे हे दोन्ही प्राणघातक व्हेरिएंट्स या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळले होते. BA.5 आतापर्यंत 47 देशांमध्ये आणि BA.4 आतापर्यंत 42 देशांमध्ये पसरला आहे.

करोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या व्यक्तीत आढळला BA.5

-ba-5

BA.5 सबव्हेरिएंट संसर्गाचे प्रकरण ज्या व्यक्तीमध्ये आढळून आले त्या व्यक्तीने कोरोनाचे दोन्ही वॅक्सिन आधीच घेतलेले होते. तर BA.4 च्या तीनही केसेसमधील लोकांचे लसीकरण झालेलं नव्हतं. BA.4 च्या तीन प्रकरणांपैकी दोन 11 वर्षांच्या मुली आहेत ज्या अद्याप लसीकरणासाठी पात्रच नाहीत.

(वाचा :- पोट साफ न होण्याची व मुळव्याधाची समस्या चुटकीसरशी होईल छुमंतर, फक्त फॉलो करा न्युट्रिशनिस्टचे ‘हे’ साधेसोपे नियम..!)

BA.4 आणि BA.5 किती घातक

ba-4-ba-5-

असे सांगितले जात आहे की कोरोनाच्या या व्हेरिएंट्सनी संक्रमित झालेल्या लोकांमध्ये कोणतीही गंभीरता किंवा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाहीये. ज्या देशांमध्ये ही रूपे कोरोनाच्या चौथ्या लाटेचे कारण बनली आहेत, तेथे सुद्धा रुग्णांमध्ये याची तीव्रता, भयंकर स्वरूप किंवा कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीयेत.

(वाचा :- How to increase sperm count : सावधान, ‘या’ एका चुकीमुळे पुरूषांची स्पर्म क्वॉलिटी होतीये खराब, झपाट्याने वाढतायत नपुंसकतेची प्रकरणं..!)

BA.4 आणि BA.5 ची लक्षणे

ba-4-ba-5-

आतापर्यंत BA.4 आणि BA.5 ची कोणतीही विशिष्ट लक्षणे आढळलेली नाहीत. बाधित रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाहीये. ही ओमिक्रॉनची सबव्हेरिएंट असल्याने त्यांच्यात असलेले गुणधर्म जवळ जवळ ओमिक्रॉनशी मिळती-जुळतीच आहेत. ओमिक्रॉनच्या संसर्गा दरम्यान दिसणारी कोरोनाची सामान्य लक्षणे म्हणजे घसा खवखवणे, घशात खाज येणे, डोकेदुखी, ताप, थकवा आणि स्नायूदुखी इत्यादी आहेत.

(वाचा :- 1 किलो वजन कमी केलं म्हणून नितीन गडकरींनी दिली 1000 करोडची ऑफर, BJP च्या मंत्र्याने आनंदाच्या भरात ‘हे’ 4 पदार्थ खाऊन घटवलं 15 किलो वजन..!)

BA.4 आणि BA.5 चौथी लाट आणू शकतात का?

ba-4-ba-5-

तज्ञांनी म्हटले आहे की नवीन सबव्हेरिएंट आणि कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होणं म्हणजे नवीन लाट आली असे नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामुळेच तज्ञ सतत कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचा आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत आहेत.

(वाचा :- Mahima Chaudhary : अगदी वेळेवर ‘हे’ योग्य काम करून महिमाने केली ब्रेस्ट कॅन्सरवर मात, प्रत्येकीने शिकावा यातून धडा..!)

बचावासाठी उपाय

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून ज्या वेगाने प्रकरणे वाढत आहेत, ते पाहता जूनच्या अखेरीस कोरोनाची चौथी लाट येण्याची IIT-कानपूरच्या संशोधकांची भविष्यवाणी खरी ठरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. हेच कारण आहे की तज्ञ सतत मास्क लावणे, बूस्टर शॉट्स घेणे, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता यांसारख्या कोरोनाच्या नियमांवर अधिक भर देण्यास सांगत आहेत.

(वाचा :- Diet Tips : चपाती आणि भात एकत्र खावं की खाऊ नये? एक्सपर्टने सांगितले, दोन अन्नपदार्थ एकत्र खाण्यामागचे नियम)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.