मुंबई: अभिनेता ओंकार भोजने आणि अभिनेत्री वनिता खरात या जोडीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये विविध स्किट एकत्र सादर करत प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांची जोडी आजही प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र ओंकारने हा शो सोडल्यानंतर या कार्यक्रमांचा प्रेक्षकांनी नाराजी आणि आश्चर्यही व्यक्त केलं. ओंकारने अशाप्रकारे अचानक हा शो सोडण्यावर वनिताने हल्लीच एक प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमातून गेल्या काही महिन्यात विविध कलाकारांनी शो सोडला, याविषयी वनिताचं नेमकं मत काय आहे असा सवाल तिला विचारण्यात आला होता.

वनिताने दिली अशी प्रतिक्रिया

अभिनेत्री म्हणाली की, ‘मला असं वाटतं की शो सोडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, वैयक्तिक मत आहे. त्यावर आपण बोलणारे कोणीच नाही. त्यांना काय वाटत असेल, त्यांना वेगळं काम मिळालं असेल आणि याबाबत आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या निर्णयावर त्यांना ट्रोल करणं चुकीचं आहे. आपण चर्चा करत राहाणं चुकीचं आहे. प्रत्येकाचं कारणं वेगळी असतात.’ ओंकारची आठवण येते का असे विचारले असता अभिनेत्री म्हणाली की ती त्याला खूपच मिस करते.

लग्न केलसं का तू? अमृता देशमुखचा ‘तो’ फोटो पाहून सोशल मीडियावर चाहत्याचा सवाल
अभिनेत्री ओंकारविषयी म्हणाली की ती त्याला खूप मिस करते. वनिता म्हणाली की, ‘मी, ओंकार आणि गौरव यांची खूप स्किट एकत्र झाली आहेत. तो माझा खूप चांगला मित्र आहे. मात्र तो जे काही करतोय तेही उत्तम आहे. आम्ही पुढे काम करू एकत्र, पण आमची मैत्री कधीच तुटणार नाही.’ जेव्हा तो सोडून गेला तेव्हा खूपच वाईट वाटल्याचं वनिता म्हणाली. ती तेव्हा त्याला मिठी मारून रडली होती. वनिताने एकीकडे त्याला नको जाऊ असेही म्हटलेले, पण दुसरीकडे तिला असेही वाटत होतं की हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. अभिनेत्रीने एका सकाळ ऑनलाइनच्या पॉडकास्टमध्ये ही प्रतिक्रिया दिली.

अखेर ओंकार भोजने वनिताला भेटायला आलाच! दोघांना मिठी मारताना पाहून नवऱ्याने दिली अशी रिॲक्शन


दरम्यान ओंकारने हास्यजत्रा सोडल्यावर अशही अफवा पसरली होती की वनिता आणि ओंकारमध्ये काहीतरी बिनसलं आहे. कारण वनिताच्या लग्नात ओंकार आला नव्हता. मात्र त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी ओंकार गिफ्ट घेऊन वनिताच्या सासरी पोहोचलेला. या दोघांमधील निखळ मैत्री या व्हिडिओतून पुन्हा एकदा दिसली आणि त्या अफवांनाही पूर्णविराम मिळालेला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *