गांधी जयंती दिनी राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले:म्हणाले – बेताल वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते, त्यामुळे असल्यांचा सुळसुळाट झाला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट करत खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये महात्मा गांधींचे विचार सांगत बेताल वक्तव्ये करणाऱ्यांना देखील फटकारले आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना फारच बरे दिवस आले आहेत. काहीही बोलले, कितीही बेताल वक्तव्ये केली, तरी प्रसिद्ध मिळते हे माहीत झाल्यामुळे असल्यांचा सुळसुळाट झाला आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी माध्यमांना देखील सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना देखील जयंतीनिमित्त अभिवादन केले. राज ठाकरे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले की, आज महात्मा गांधींची जयंती. ‘बोलणे हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’, असे गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला ‘मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर….’ याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचे, हे सध्या सुरु आहे. प्रसिद्धी मिळत असल्याने वाचाळवीरांचा सुळसुळाट राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोलले, कितीही बेताल वक्तव्य केली, तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होत आहे, कारण माध्यमे यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणे शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचे महत्व पटणे आणि सारखे व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. लाल बहादुर शास्त्रींना अभिवादन
दरम्यान, राज ठाकरे यांनी देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देखील अभिवादन केले आहे. लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिले. ह्या राष्ट्रपुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. असे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.