पुतळा कोसळल्याच्या चौथ्या दिवशीमुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी:राडा करणाऱ्या दोन्ही गटातील 150 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यांतच कोसळल्याच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधक महाविकास आघाडीसह विविध संघटनांचे पदाधिकारीही या घटनेविरोधात निदर्शने करत आहेत. सत्ताधारी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्याच सरकारविरोधात मूक आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर घटनेच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली. यापूर्वी भाजप आमदार आशिष शेलार व स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माफी मागितली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उपरती झाली. शंभर वेळा माफी मागतो
‘छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. कृपा करून त्यावर राजकारण करू नका. मी छत्रपतींच्या चरणावर डोके ठेवून एकदा नाही तर शंभर वेळा माफी मागतो. महाराजांनी विरोधकांना सुबुद्धी द्यावी. त्यांनी या विषयात राजकारण आणू नये.’
चौकशीचा फार्स : नौदल, राज्य सरकारी अधिकाऱ्यांसह तंत्रज्ञांची संयुक्त समिती धक्कादायक : परवानगी फक्त ६ फुटांची, मात्र नौदलाने उभारला ३५ फुटी पुतळा राज्यात कुठेही पुतळा उभारायचा असेल तर कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची परवानगी मागताना हा पुतळा फक्त ६ फुटांचाच असल्याचे सांगण्यात आले होते. ३५ फूट पुतळा उभारणार असल्याचे नौदलाने सांगितलेही नव्हते, असा गौप्यस्फोट संचालनालयाचे प्रमुख राजीव मिश्रा यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘या प्रकरणात आमची काहीही चूक नाही. आम्ही केवळ तो पुतळा शिवाजी महाराजांसारखा दिसतो का तेवढेच सांगण्याचे काम करतो. यात शिल्पकाराने घाईघडबडीमध्ये काहीतरी चूक केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. इतक्या मोठ्या उंचीचा पुतळा उभारायचा असेल तर ब्राँझचाच करायला हवा होता. स्टील प्लेट्स टाकून त्या ठिकाणी जी वेल्डिंग करण्यात आली ते कामही निकृष्ट होते त्यामुळे हे घडले असे वाटतेय.’