दसरा महोत्सवावर 30 सीसीटीव्हीचा वॉच, पाच चिडीमार पथके कार्यरत राहणार:पोलिस विभागाची जय्यत तयारी; पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती
हिंगोलीच्या एेतिहासीक दसरा महोत्सवात होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून या शिवाय दोन वॉच टॉवर एक दोन पोलिस मदत केंद्र उभारले जाणार आहे. दसरा महोत्सवात अनुचीत प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे. हिंगोली येथील ऐतिहासीक दसरा महोत्सवाला लवकरच सुरवात होणार आहे. रामलिला मैदानावर कृषी व औद्योगिक प्रदर्शनीच्या उभारणीचे काम सुरु आहे. संसारोपयोगी साहित्याचे स्टॉल उभारले जात असून आकाश पाळण्याची उभारणी केली जात आहे. या शिवाय १० स्टॉल खवय्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महसूल प्रशासनाकडून या उभारणीच्या कामाची वेळोवेळी पाहणी केली जात आहे. दरम्यान, पोलिस विभागाकडूनही या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये तसेच रामलिला मैदानावर ३० सीसीटीव्ही कॅमेरेबसविले जाणार आहेत. या शिवाय प्रदर्शनीमध्ये दोन वॉच टॉवर असणार आहेत. तसेच प्रदर्शनमध्ये व दसरा महोत्सव समितीच्या कार्यालयाजवळ अशी दोन पोलिस मदत केंद्र उभारली जाणार आहेत. या ठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात केली जातील. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेेचे निरीक्षक विकास पाटील यांची पथके दसरा महोत्सवात वेळोवेळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. या शिवाय दसरा महोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पाच चिडीमार पथके तैनात केली जाणार आहेत. हि पथक दररोज कार्यरत राहतील. या शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष स्थापन केले जाणार आहेत. आदल्या दिवशीच्या रात्रीचे फुटेज दुसरी दिवशी सकाळी तपासले जाणार आहेत. दसरा महोत्सवात मोठा पोलिस बंदोबस्त राहणार असून अनुचीत प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.