[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे: वाहतूक नियभंगाचा प्रलंबित दंडात नागरिकांना तडजोड करून भरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. येत्या नऊ डिसेंबर रोजी लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. त्याच्या अगोदरपासून म्हणजेच २२ नोव्हेंबरपासून नागरिकांना येरवडा येथील वाहतूक शाखेत तडजोडीने दंड भरण्यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

वाहतुकीचा नियभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर खटले भरले आहेत. पण, हे नागरिक न्यायालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच, थकित दंडाचे प्रमाण वाढत असून त्याचा फटका नागरिकांना बसतो. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी एकत्रित येत वाहतूक नियभंगाचा प्रलंबित दंड लोकअदालतीमध्ये तडोजोडीने भरण्यासाठी नागरिकांना संधी दिली होती. त्यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या लोक अदालत व मदत कक्षाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

जरांगेंची आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये, जाती जोडो अभियानाचे धनंजय कानगुडे यांचा आरोप
आता पुन्हा ९ डिसेंबर रोजी लोक अदालत होणार आहे. यामध्ये शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना त्यांच्या वाहनांवर असलेला दंड तडजोडीने भरण्याची संधी राहणार आहे. हा दंड भरण्यासाठी २२ नोव्हेंबर पासून येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान नागरिकांना दंड भरता येणार आहे. यासाठी ग्रामीण, पिंपरी चिंचवड व पुणे शहर असे स्वतंत्र टेबल असणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर यांनी केले आहे.

वाहतूक कोंडी दिसताच अमोल कोल्हे रस्त्यावर उतरले, खासदारांनी केली वाहतूक सुरळीत

Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *