मुंबई : भारतासमोर आता सेमी फायनलमध्ये उभा ठाकला आहे तो न्यूझीलंडचा संघ. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २०१९ साली वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल झाली होती. त्यावेळी न्यूझीलंडने बाजी मारली होती. पण यावेळी मात्र भारताला बदला घेण्यासाठी संधी आहे. पण भारताला जर ही सेमी फायनल जिंकायची असेल तर त्यासाठी त्यांना एक गोष्ट करावी लागेल, असे भारतासाठी मॅचविनर ठरलेल्या कुलदीप यादवने सांगितले आहे.

भारतीय संघाने २०१९ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येही अशीच दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेच भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. त्यावेळी भारतीय संघाकडून काही चुका झाल्या होत्या. पण यावेळी मात्र त्या चुका भारताने टाळल्या तर त्यांना यावेळी सेमी फायनल जिंकता येऊ शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना भारताला त्यांच्या घरच्या मैदानात खेळायला मिळणार आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामान मुंबईच्या वानखेडे मैदानात होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना मदत करते, त्यामुळे न्यूझीलंडच्या संघालाही या खेळपट्टीचा फायदा होऊ शकतो. पण भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्यासाठी एक मास्टरस्ट्रोक सांगितला आहे.

कुलदीप यादव म्हणाला की, ” सेमी फायनलचा सामना हा वानखेडेवर होणार आहे. यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २०१९ साली सेमी फायनल झाली होती. पण त्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर बरेच सामने खेळलो आहोत. कारण त्या गोष्टीला आता चार वर्षे झाली आहेत. वानखेडेवर सामना होत असल्यामुळे फलंदाजांना चांगलीच मदत मिळू शकते. त्यामुळे या सामन्यात एकच गोष्ट केली तर आ्ही न्यूझीलंडच्या संघावर दडपण आणू शकतो. जर आम्ही न्यूझीलंडच्या विकेट्स झटपट घेतल्या तर त्यांच्यावर चांगलेच दडपण येईल. त्यामुळे फक्त ही एक गोष्ट केली तर आम्हाला सेमी फायनलचा सामना जिंकता येऊ शकतो.”

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

वानखेडेच्या खेळपट्टीवर फलंदाजांना चांगली मदत मिळत असते. त्यामुळे जर भारताने न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्के दिले तर त्यांच्या हातून सामना निसटू शकतो, असे कुलदीप यादवला वाटत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *