मोफत आरोग्य शिबिरामध्ये एक हजार ५७ रुग्णांनी घेतला लाभ:सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य – पवार

मोफत आरोग्य शिबिरामध्ये एक हजार ५७ रुग्णांनी घेतला लाभ:सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य – पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उद्योजक मनोज पवार यांनी रविवारी केले. कन्नड शहरातील जैन कॉम्प्लेक्समध्ये उद्योजक मनोज पवार, उद्योजिका ऊर्मिला पवार यांच्या संकल्पनेतून रविवारी आयोजित केलेल्या मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रदीप साळुंके, पुष्पाबाई केशवराव पवार, मनोज पवार, ऊर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मनोज पवार बोलत होते. पवार म्हणाले की, अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे. आजारपणाचे निदान झाले की, डॉक्टरांना उपचार करणेदेखील शक्य होते. या वेळी प्रदीप साळुंके यांनी बोलताना मनोज पवार यांनी आयोजित केलेल्या या सर्वरोग निदान शिबिराचे कौतुक केले. रायभान जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर महिला उद्योजिका ऊर्मिलाताई पवार यांनी आभार मानले. महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी काकासाहेब तायडे, प्रवीण घाटगे, महेश सोनवणे, संदीप शिंदे, मनोज देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शहरासह तालुक्यातून आले हजारोग रुग्ण शिबिराचा शहरासह तालुक्यातील १ हजार ५७ रुग्णांनी लाभ घेतल्याचे डॉ. प्रकाश धर्माधिकारी, डॉ. मनीषा कोरडे, डॉ. विशाल भिंगारे, डॉ. दीपाली राठोड, डॉ. आनंद गोयंका, डॉ. मददसिर अली, डॉ. महेश चव्हाण, डॉ. अजय गावंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर या शिबिराला जिल्ह्यातील अनेक नामवंत वैद्यकीय अधिका-यांनी हजेरी लावत रुग्णांची सेवा केली.

​आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उद्योजक मनोज पवार यांनी रविवारी केले. कन्नड शहरातील जैन कॉम्प्लेक्समध्ये उद्योजक मनोज पवार, उद्योजिका ऊर्मिला पवार यांच्या संकल्पनेतून रविवारी आयोजित केलेल्या मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रदीप साळुंके, पुष्पाबाई केशवराव पवार, मनोज पवार, ऊर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मनोज पवार बोलत होते. पवार म्हणाले की, अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे. आजारपणाचे निदान झाले की, डॉक्टरांना उपचार करणेदेखील शक्य होते. या वेळी प्रदीप साळुंके यांनी बोलताना मनोज पवार यांनी आयोजित केलेल्या या सर्वरोग निदान शिबिराचे कौतुक केले. रायभान जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर महिला उद्योजिका ऊर्मिलाताई पवार यांनी आभार मानले. महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी काकासाहेब तायडे, प्रवीण घाटगे, महेश सोनवणे, संदीप शिंदे, मनोज देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शहरासह तालुक्यातून आले हजारोग रुग्ण शिबिराचा शहरासह तालुक्यातील १ हजार ५७ रुग्णांनी लाभ घेतल्याचे डॉ. प्रकाश धर्माधिकारी, डॉ. मनीषा कोरडे, डॉ. विशाल भिंगारे, डॉ. दीपाली राठोड, डॉ. आनंद गोयंका, डॉ. मददसिर अली, डॉ. महेश चव्हाण, डॉ. अजय गावंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर या शिबिराला जिल्ह्यातील अनेक नामवंत वैद्यकीय अधिका-यांनी हजेरी लावत रुग्णांची सेवा केली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment