तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. पण काही लोकांना वेळेअभावी व्यायाम करता येत नाही. आता त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण, काही सवय लावल्यानंतर तुम्हाला वर्कआउटसारखे फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया व्यायाम न करता तंदुरुस्त कसे राहायचे.

कामाच्या अभावी किंवा बिझी शेड्युलमुळे अनेकांना इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही. अशांना हे ५ उपाय अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. ज्यांना व्यायामासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी या चांगल्या सवयी खूप उपयुक्त आहेत. तुम्ही वर्कआउटच्या मूडमध्ये नसतानाही या सवयी लावू शकता. पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला व्यायाम करता येत असेल तर त्याकडेही लक्ष द्या. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​संगीत

तणाव कमी करण्यासाठी किंवा मूड चांगला ठेवण्यासाठी संगीत ऐकले पाहिजे. संगीत ऐकल्याने आनंदी हार्मोन डोपामाइनचे उत्पादन वाढते. हे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी करते आणि मानसिक आरोग्य सुधारते. मूड सुधारण्यासाठी वेगवान संगीत ऐकले पाहिजे. संगीताच्या आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

(वाचा – दररोज ग्रीन टी पिताना त्याच्या फायद्यांसोबतच नुकसानही जाणून घ्या, कळत नकळत शरीरावर होतो ‘हा’ परिणाम))

​योग्य ऍक्टिविटी करेल मदत

तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमीच व्यायाम करणे आवश्यक नसते. त्याऐवजी, तुम्ही अशा अ‍ॅक्टिव्हिटी करू शकता, ज्यामुळे वर्कआउटसारखा प्रभाव पडतो. चालणे, नाचणे, सायकल चालवणे, बागकाम हे रोजचे उत्तम उपक्रम आहेत. तसेच घरगुती काम करूनही तुमच्या शरीराला सकारात्मक फायदा होतो.

(वाचा – Weight Loss Story: जेवणातले हे दोन पदार्थ वगळून पुणेकर तरूणाने ७ महिन्यात घटवलं ३८ किलो वजन)

​चांगली झोप घ्या

चांगली झोप थकवा, नैराश्य, मानसिक विकार टाळते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक चांगले झोपत नाहीत त्यांना मानसिक समस्या होण्याची शक्यता 5 पट जास्त असते. दररोज 7-8 तास झोप घेतल्याने मूड सुधारतो आणि ऊर्जा टिकून राहते. अशावेळी तुम्ही ठरवून चांगली झोप घेऊ शकता.

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार))

​पाणी पियत राहा

दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हे लठ्ठपणा टाळते आणि त्वचा चमकदार बनवते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मूड खराब होतो आणि मेंदूचे कार्य मंदावते. पुरेसे पाणी प्यायल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो आणि डोपामाइन आणि सेरोटोनिनचे उत्पादन वाढते. फक्त पाणी पिणे हे शक्य होत नाही अशावेळी तुम्ही लिंबूचे सरबत देखील घेऊ शकता.

(वाचा – Weight Loss Drink: पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी ‘हे’ ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये)

​परिपूर्ण आहार घ्या

व्यायाम करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपले चुकीचे खाणे. पण तुम्ही हेल्दी डाएट घेऊन वर्कआउट टाळू शकता. तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळे, संपूर्ण धान्य, भाज्या आणि काजू यांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला भरपूर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. सकस आहार मानसिक आरोग्यासाठीही चांगला आहे.

(वाचा – Custard Apple Benefits : थंडीतल्या आजारांवर गुणकारी, बीपी-हार्टसह पचनासंबंधींच्या त्रासांवर सीताफळं ठरतं रामबाण)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *