जातींचा डेटा जनकल्याणासाठी उपयोगात यावा- सुनील आंबेकर:जातनिहाय जनगणनेस संघ अनुकूल; राजकीय वापर करण्यास मात्र विरोध

काँग्रेसची मागणी असलेल्या जातनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल झाला आहे. ‘विशिष्ट समुदाय किंवा जातींवरील डेटा गोळा करण्यावर अाक्षेप नाही. पण त्याचा वापर राजकीय नव्हे तर जनकल्याणासाठी केला जावा,’ असे मत अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, जात आणि जातीय संबंध हा हिंदूंसाठी संवेदनशील मुद्दा आहे. आपल्या राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी हे महत्त्वाचे आहे. याला अतिशय गांभीर्याने हाताळले पाहिजे. केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीनंतर जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर आंबेकर म्हणाले, सर्व कल्याणकारी कार्यांसाठी, विशिष्ट समुदाय किंवा जातीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विशिष्ट समुदायांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारला आकडेवारीची गरज आहे. ही कसरत खूप चांगल्या प्रकारे केली जाते. त्यामुळे सरकार डेटा गोळा करते. यापूर्वीही केले गेले. कोणतीही अडचण नाही. ते म्हणाले, “ते फक्त त्या समुदाय आणि जातींच्या कल्याणासाठी असले पाहिजे. त्यामुळेच आम्ही लक्ष्मणरेषा निश्चित केली आहे.’ विरोधी पक्षांच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीदरम्यान आंबेकर यांनी हे विधान केल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. तामिळनाडूतील धर्मांतर चिंताजनक आंबेकर म्हणाले, तामिळनाडूतील धर्मांतर प्रकरण चिंताजनक आहे. येत्या काही दिवसांत याची गांभीर्याने दखल घेऊन जमिनीच्या पातळीवरून माहिती संकलित केली जाणार आहे. हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी बांगलादेशाशी बोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेे केंद्र सरकारला हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणासाठी बांगलादेश सरकारसोबत चर्चा करण्याचा आग्रह केला. आंबेकर म्हणाले, ‘बांगलादेशाची स्थिती ‘अत्यंत संवेदनशील मुद्दा’ आहे. हिंदू व इतर अल्पसंख्याकांबाबत सर्वच जण चिंतातूर आहेत.’ कोलकाता प्रकरण अत्यंत दुर्दैवी कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरण दुर्दैवी असल्याचे सांगत संघाने निषेध केला आहे. तसेच महिलांना जलद न्याय देण्यासाठी कायद्यांचा आढावा आणि दंडात्मक कारवाईवर भर दिला. संस्कृती, शिक्षण, मोर्चा, जनजागृती आणि स्वसंरक्षण या पाच आघाड्यांवर संघ महिलांच्या सुरक्षेसाठी मोहीम राबवणार असल्याचे आंबेकर म्हणाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment