सत्ताधारी, विरोधकांत जीभ-दातासारखे नाते असावे:नामच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांचे बोल, स्वामीनाथन आयोग लागू केल्यास शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळेल
स्वामीनाथन आयोग सरकारने लागू केला तर शेतकऱ्यांच्या मालास बाजारभाव चांगला मिळेल. मला अनेक पुरस्कार मिळाले, पण “नाम’ मध्ये काम करून जे समाधान मिळाले ते शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जीभ आणि दातासारखे नाते असले पाहिजे, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय जलसंसाधनमंत्री सी. आर. पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते मकरंद अनासपुरे, संगीता पाटील उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, नाम फाउंडेशनने ९ वर्षांत अनेक कामे केली. केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकते असे काही जणांना वाटते. पण नाना, मकरंदसारखे लोक बदल घडवत असतात. वर्धनाची कामे होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. शेतातील कामे केलीत : सी.आर. पाटील केंद्रीय जलसंसाधनमंत्री सी. आर. पाटील म्हणाले, मी शेतकरी असून माझ्याकडे १५० एकर शेती आहे. शेतातील कामे मी केली आहेत. प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन “हर घर जल’ राबवत आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.