हळद (turmeric) एक असा मसाला आहे ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच पण अनेक आजारांमध्ये उपचार म्हणून सुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असणारे करक्यूमिन नावाचे तत्व त्याला पिवळा रंग प्रदान करते आणि हेच तत्व हळदीची सगळ्यात मोठी ताकद सुद्धा आहे. हळदीचा वापर आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये अगदी जुन्या काळापासून केला जात आहे आणि आज सुद्धा भारतातील कित्येक घरांमध्ये विविध उपायांसाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांबाबत बोलायचे झाले तर यामध्ये अँटीऑक्सिडंड, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-म्यूटाजेनिक आणि अँटी-इंन्फ्लमेट्री अशा गुणधर्मांचे भांडार आढळते.

याच गुणधर्मांमुळे विविध समस्यांवर लढण्यासाठी हळद मदत करते. हळद त्या मोजक्याच मसाल्यांपैकी एक आहे ज्यात हे सर्व गुणधर्म आढळतात. म्हणूनच हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदात हळदीचा उपयोग काय? हा मसाला भारत आणि चीनमध्ये हजार वर्षांपूर्वी वापरला जात असल्याचे मानले जाते. काही कथा असेही सांगतात की ते सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी हळदीचा वापर केला गेला होते. याचा उपयोग आयुर्वेदात प्राचीन काळापासून केला जात आहे.

हळदीचे तोटे आहेत का

हळदीचे एवढे सारे लाभ नक्कीच आहेत. पण तुम्हाला सुद्धा माहित आहे की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट बाजू! हळदीची सुद्धा एक वाईट बाजू आहे. तुम्ही एका मर्यादित प्रमाणात उपयोग केला तर नक्कीच हळद ही लाभदायक आहे. पण अति प्रमाणात वापर केला तर त्याचे तोटेसुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतातच. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच प्रकारच्या व्यक्तींना हळद मानवत नाही. अनेकांसाठी ती धोकादायक ठरू शकते.

(वाचा :- 72 वर्षांचे नरेंद्र मोदी 24 तास काम करण्याइतके फिट कसे? या 5 गोष्टी त्यांच्या एनर्जीला धक्काही लागू देत नाहीत..)

हळद हानिकारक का आहे?

हळदी मध्ये असणारे करक्यूमिन सर्वात शक्तिशाली तत्व आहे पण हे शरीरादरावर अवशोषित केले जात नाही. एका अभ्यासात दिसून आले आहे की उंदीर सुद्धा त्यांच्या शरीरात जाणाऱ्या करक्यूमिन पैकी केवळ 1% करक्यूमिनच अवशोषित करतात. हे तत्व कोणत्याही पदार्थांसह लगेच मिक्स होते. यामुळे होतं काय तर करक्यूमिन एक तर खराब होतं किंवा बदलूनच जातं. जाणकारांच्या एका रिपोर्ट मध्ये असा उल्लेख आहे की हळदी मधील मुख्य घटक करक्यूमिन वेळ आणि पैसा यांची बरबादी आहे.

(वाचा :- पोट साफ न होणं, मुळव्याध, शौचाच्या जागेची जखम, बद्धकोष्ठतेसाठी अमृत आहे डॉक्टरांचे हे 5 उपाय, झटक्यात व्हाल बरे)

रक्तस्त्राव होण्याची समस्या

ज्या लोकांना वारंवार नाकातून रक्त येण्याची समस्या असेल तर अशा लोकांनी सुद्धा हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे. याशिवाय रक्तस्त्रावाशी निगडीत अन्य कोणताही आजार वा समस्या असेल तरी त्यांनी सुद्धा अजिबात हळदीचे सेवन करू नये आणि जरी केले तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते करावे व अतिशय कमी प्रमाणात करावे. हळदीचे सेवन केल्यास रक्तप्रवाह संथ होतो आणि स्थिती अतिशय बिघडू शकते. ज्या लोकांचे रक्त पातळ आहे वा ज्यांना अशी समस्या आहे त्यांनी सुद्धा हळदीचे सेवन अजिबात करू नये. कारण हळद ही रक्त अधिक पातळ करण्यचे काम करते. जर सततच्या सेवनाने रक्त अधिक पातळ झाले तर समस्या निर्माण होऊ शकते.

(वाचा :- Liver Cancer : तुमची ही एक चूक वाढवते तब्बल 75 टक्क्यांनी लिव्हर कॅन्सरचा धोका, करा हे उपाय, नाहीतर जीव धोक्यात)

इम्युनिटी मजबूत करण्यासाठी

गरम दुधात चिमूटभर हळद टाकल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असे मानले जाते. शतकानुशतके, पालक हा मसाला सामान्य सर्दी आणि खोकला बरा करतो या विश्वासाने मुलांना खायला देत आहेत. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- पाय सुन्न होतात, मुंग्या येतात व धारधार पिन टोचल्यासारख्या वेदना होतात? मग सावध व्हा, नाहीतर होतील भयंकर परिणाम)

हळदीचे फायदे सुद्धा आहेत

हळद ही शरीरासाठी उपयुक्त आहे म्हणूनच हळदीचा आहारात नियमित रूपाने समावेश केला जातो, जेणेकरून आहारातून का होईन पण शरीराला हळदीचा फायदा व्हावा. भारतीय मसाल्यांत सुद्धा हळदीला मुख्य स्थान असून आरोग्याशी निगडीत अनेक आजार आणि समस्या दूर करण्याची क्षमता हळदीमध्ये असते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी हळदी पासून तयार होणारे गोल्डन ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात हळद उकळवून तयार होणारे मिश्रण प्यावे. याशिवाय मध वा पाण्यात मध्ये सुद्धा हळद टाकून ती चांगली उकळवूनही तुम्ही हळदीचे सेवन करू शकता. यामुळे सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

(वाचा :- चुकूनही करू नका ‘या’ 9 संकेत व लक्षणांकडे दुर्लक्ष, एक नाही तर संपूर्ण 5 प्रकारच्या कॅन्सरची असू शकते सुरूवात.!)

पित्ताशयाच्या पिशवीची समस्या असणा-यांनी

ज्या लोकांना पित्ताशयाची समस्या आहे त्यांनी हळद खाणे बंद केले पाहिजे कारण पित्त स्राव वाढवण्यासाठी हळदीचा गुणधर्म संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू शकतो. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- 24 तासांत किती वेळा जेवणं दीर्घायुष्यासाठी गरजेचं आहे? म्हातारपणात जागेला खिळायचं नसेल तर ऐका डॉक्टरांचा सल्ला..)

डायबिटीज आणि हळद

जे लोक शुगर पेशंट आहेत अर्थात ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना डॉक्टरांकडून रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात. तसेच या औषधांमुळे रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित होते व एकंदर मधुमेह हा नियंत्रणात ठेवला जातो. मात्र जर अशा रुग्णांनी हळदीचे सेवन केले तर रक्तातील साखरेची मात्र अतिशय जास्त कमी होऊ शकते आणि ही गोष्ट मधुमेहाच्या रूग्णांसाठी अजिबात योग्य नाही. साखरेचे शरीरातील प्रमाण हे नियंत्रितच असले पाहिजे. ना जास्त ना अतिशय कमी. ते मध्यम असायला हवे. म्हणूनच मधुमेहाचा तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही हळदयुक्त आहार न घेणेच उत्तम!

(वाचा :- Fatty Liver Disease : झोपण्याशी संबंधित ही सवय वाढवते लिव्हर सडण्याचा धोका, ताबडतोब बदला नाहीतर होईल लिव्हर फेल)

आयर्नची कमतरता असल्यास

हळद शरीराच्या आयर्न शोषण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात आधीच लोहाची कमतरता असेल तर हळदीचे सेवन बंद करा. जर तुम्हाला लिव्हरचा आजार असेल तर तुम्ही हळदीचे सेवन टाळावे. यामुळे तुमची स्थिती बिघडू शकते. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- High BP side effects : एक पॉइंटही वाढला ब्लड प्रेशर तर वितळतील पूर्ण शरीरातील हाडे, स्टडीमध्ये धक्कादायक खुलासा)

हळदीचे तेल असते गुणकारी

हळदीचे तेल हे हळदी सारखेच गुणकारी असते. यात शरीरावर येणारी सूज रोखणारे गुण असतात आणि म्हणूंच सांधेदुखीवर हळदीचे तेल रामबाण ठरते. या शिवाय त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगस हळदीच्या तेलाच्या वापरामुळे वाढत नाहीत. तसेच विषाणू आणि जंतू यांना नष्ट करण्याची क्षमता हळदीच्या तेलामध्ये असते. शरीरातील निरुपयोगी झालेल्या पेशींना नीट करण्याची क्षमता सुद्धा हळदीच्या तेलामध्ये आढळून येते. म्हणूनच मंडळी आवर्जून हळदीच्या तेलाचा एकदा तरी सांधेदुखीवर वापर करून पहा.

(वाचा :- चालताना पायांवर ठेवा बारीक नजर, हे 1 लक्षण दिसलं तर समजून जा रक्ताच्या नसांत भरलंय घाणेरड भयंकर LDL कोलेस्ट्रॉल)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.