[ad_1]

मुंबई: साऊथ स्टार महेश बाबूचा आज वाढदिवस. महेश बाबू ४८ वा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. महेश बाबूला प्रिन्स ऑफ टॉलिवूड असंही म्हटलं जातं. महेश बाबू आता फक्त साऊथमध्येच नव्हे तर पॅन इंडिया स्टार म्हणून ओळखला जातोय. महेश बाबूच्या सिनेमांची जितकी चर्चा होते, तितकीच त्याच्या खासगी आयुष्याचीही चर्चा होते. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची लव्हस्टोरी ही आजही चर्चेत असते.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप; ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले शुटिंगचे फोटो
महेश बाबू आणि नम्रतानं १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं होतं. जवळपास चार वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं. या काळात त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कोणालाच कळू दिलं नव्हतं. रिलेशनशिपबद्दल कोणालाही न सांगितल्याबद्दल नम्रतानं सांगितलं होतं की, ‘महेशला नियमांप्रमाणे जगायला आवडतं. आम्ही चार वर्ष एकमेकांना डेट केलं. पण तरीही त्याला आपल्या नात्याबद्दल लोकांना कळावं असं वाटत नव्हतं. मीडियाकडून सारखं विचारलं जात होतं. पण महेशचं मत याबाबत निश्चित होतं. त्याला स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. महेशसाठी कामापेक्षाही कुटुंब महत्त्वाचं आहे. अनेक कलाकारांमध्ये ही गोष्ट दिसत नाही. त्याला त्याचं स्टारडम आवडतं. पण ते स्टारडम तो डोईजड होऊ देत नाही.’

…तरंच लग्न करेन
लग्नासाठी महेश बाबूनं नम्रतासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर सिनेमात काम करायचं नाही, अशी अट महेशबाबून नम्रतासमोर ठेवली होती.नम्रता महेश बाबूच्या प्रेमात होती. त्यामुळं तिनं तिच्या करिअरला महत्त्व न देता महेश बाबूची अट मान्य केली. यानंतर दोघांनी लग्न केलं.
Nitin Desai case: देसाई कुटुंबियांच्या गंभीर आरोपानंतर Edelweiss कंपनीचं मोठं पाऊल

नम्रतानं स्वत: एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, ‘महेशचे विचार पहिल्यापासून याबाबत अगदीच स्पष्ट होते. त्याला बाहेर काम न करणारी बायको हवी होती. मी सिनेसृष्टीत नसते तरी त्यानं मला माझी नोकरी सोडायला सांगितली असती. आमचे विचार पहिल्या पासून एकमेकांना माहिती होते.

नम्रतानंही ठेवली होती अट
महेशबाबूनं जशी नम्रतासमोर अट ठेवली होती तशी नम्रतानंही त्याच्यावर एक ठेवली होती. तिनं महेश बाबूला सांगितलं होतं की, मी बंगल्यात राहणार नाही. मला अपार्टमेंटमध्ये राहायचं आहे. त्यामुळं महेश बाबूनं अलिशान असं अपार्टमेंट खरेदी केली आणि त्यांनी तिथं संसार थाटला. दरम्यान, नम्रता आणि महेश बाबू यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहे

महेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *