Best Smartphone Offers : देशात आता फेस्टिव्ह सिझन सुरू आहे. या निमित्ताने विविध स्मार्टफोन कंपन्या देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेलचे आयोजन करत आहेत. तर, काही कंपन्यांनी आधीच त्यांचे ऑफर्स जाहीर केले असून Flipkart आणि Amazon या लोकप्रिय ई-कॉमर्स साइट्सने सुद्धा देशात बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलचे आयोजन आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सेसवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. येथे आम्ही तुम्हाला फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ३० हजार रुपयांच्या आत येणाऱ्या स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत.विशेष म्हणजे या सेलमध्ये काही जबरदस्त स्मार्टफोन्स ३०, ००० रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी युजर्सना मिळेल. यात Google Pixel 6a वर उत्तम सूट मिळेल. तर, Oppo Reno 8 5G सारखा फोन .२६,९९९ रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.

Oppo Reno 8

oppo-reno-8

Oppo Reno 8 5G ची किंमत २६,९९९ रुपये आहे. Oppo Reno 8 मध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.४ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. MediaTek Dimensity 1300 (6 nm) प्रोसेसर. या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये ५० MP पहिला कॅमेरा ८ MP दुसरा कॅमेरा आणि २ MP तिरा कॅमेरा आहे. त्याच्या फ्रंटला ३२ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये ८० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० mAh बॅटरी आहे.

वाचा: MMS Case: तुमच्या प्रायव्हेट मुमेंट्सवर हिडन कॅमेराची नजर तर नाही ? असे करा माहित, घ्या विशेष काळजी

​Motorola Edge 30 5G

motorola-edge-30-5g

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या वेबपेजनुसार, Motorola Edge 30 5G ची किंमत २२, ७४९ रुपये आहे. Motorola Edge 30 १४४ Hz रिफ्रेश रेट ६.५ -इंचाचा AMOLED डिस्प्ले दाखवतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनला ऑक्टा कोर क्वालकॉम SM7325-AE स्नॅपड्रॅगन 778G+5G (6 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ४२२० mAh बॅटरी आहे. जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी केवळ ३५ मिनिटांत १०० टक्के चार्ज होऊ शकते.

वाचा:ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका कराल तर अकाउंट होईल रिकामे, मिनिटांत गमवाल आयुष्यभराची कमाई

Realme GT 2

realme-gt-2

Realme GT 2 फ्लिपकार्ट सेलवर २६,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Realme GT 2 १२० Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोच्या रिझोल्यूशनसह ६.६२ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, Realme GT 2 Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करते. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर GT 2 मध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम SM8350 स्नॅपड्रॅगन 888 5G (5 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी ६५ W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. हे Device ३३ मिनिटांत १०० टक्के चार्ज होऊ शकते.

वाचा : Reliance Jio चा ‘हा’ रिचार्ज केल्यानंतर राहा वर्षभर टेन्शन फ्री, सोबत ७३० GB डेटा आणि बरंच काही

Google pixel 6a

google-pixel-6a

सेल दरम्यान, Google Pixel 6a फक्त २७,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Google Pixel 6a मध्ये ६.१ -इंचाचा OLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर गुगल टेन्सर (5 एनएम) प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ४४१० mAh बॅटरी आहे जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

​Nothing Phone 1

nothing-phone-1

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान फोन २८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Nothing Phone 1 १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.५५-इंचाचा OLED डिस्प्ले ऑफर करतो. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित Nothing OS वर काम करतो. हे ऑक्टा कोअर क्वालकॉम SM7325-AE स्नॅपड्रॅगन 778G+ 5G (6 nm) प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. स्टोरेज वेरिएंटसाठी, हा स्मार्टफोन 8GB आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनला ४५०० mAh बॅटरीचा सपोर्ट आहे. जो १५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो जो ७० मिनिटांत १०० टक्के चार्ज होऊ शकतो.

वाचा: ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका कराल तर अकाउंट होईल रिकामे, मिनिटांत गमवाल आयुष्यभराची कमाईSource link

Leave a Reply

Your email address will not be published.