लाडसावंगी येथील हुतात्मा स्मारक परिसरात शिबिर:रोटरी क्लब संभाजीनगर मेट्रोच्या वतीने आयोजन
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथील हुतात्मा स्मारक परिसरात काँग्रेस प्रदेश सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास औताडे यांनी लाडसावंगी परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक जागरूकतेचा संदेश दिला. शिबिरात विविध आजारांचे निदान, तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले. गरजू नागरिकांना याचा मोठा फायदा झाला. रोटरी क्लब संभाजीनगर मेट्रो, जे. जे. हॉस्पिटल, महाविकास आघाडी लाडसावंगी जिल्हा परिषद गट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टरांनी सर्व वयोगटांतील रुग्णांची तपासणी केली. ज्यात हृदयविकार, मधुमेह, नेत्र तपासणी, रक्तदाब, शारीरिक व्याधींची चाचणी केली. विश्वास औताडे यांनी मनोगत व्यक्त करताना आजच्या काळात आरोग्य सेवा मिळवणे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. सर्वांनी समाजातील सर्व घटकांसाठी सतत असे उपक्रम राबविले पाहिजेत, ज्यातून आरोग्यविषयक माहिती आणि सुविधा सर्वांपर्यंत पोहोचतील. युवकांनी समाजात सेवा भावनेने काम करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी श्रद्धा औताडे, रेणुका शिंदे, मनोज शेजूळ, बाबासाहेब मोकळे, रमेश कोंडके उपस्थित होते.