5 Tips For Dealing With Osteoporosis : ऑस्टियोपोरोसिस बरा होणे शक्य नसला तरीदेखील परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तो तुम्ही निश्चितपणे व्यवस्थापित करू शकता. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या व्यक्तीने संतुलित आहार आणि व्यायामाचा समावेश असलेली निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. तसेच, डॉक्टरांनी शिफारस केलेली औषधे आणि पूरक आहार घेण्यास विसरू नका. या लेखात आम्ही तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतील. अशा काही महत्त्वाच्या टिप्सची माहिती अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ बिस्वजीत नायडू यांनी सांगितलं आहे.

ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि एखाद्याच्या गतिशीलतेवर मर्यादा घालून फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ही स्थिती सामान्यतः वृद्ध महिलांमध्ये दिसून येते. बसण्याची चुकीची पध्दत (पुढे वाकणे), धाप लागणे, उंची कमी होणे, हाडे फ्रॅक्चर होणे आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे ही त्याची लक्षणे आहेत. ही स्थिती तुमच्या दैनंदिन कामांमध्ये बाधा आणू शकते आणि तुम्हाला इतरांवर अवलंबून रहावे लागू शकते. रुग्णांच्या कुटुंबीयांनी अशा रुग्णांची घरी काळजी घेणे आणि त्यांना सक्रीय राहण्यास आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करणे ही काळाची गरज आहे.

​दररोज व्यायाम करा

जर तुमच्या प्रिय व्यक्तीला ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्येने पिडीत असेल आढळला असेल तर ती व्यक्ती न चुकता व्यायाम करत असल्याची खात्री करा. नियमित शारीरिक हालचालींमुळे स्नायूंची बळकटी आणण्यास मदत होते तसेच शारीरीक समतोल राखण्यास, योग्य शारीरीक रचना राखण्यास, वेदना व्यवस्थापित करण्यास आणि हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यास मदत होते. रुग्णाला फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली ताकद प्रशिक्षण व्यायाम करण्यास मदत करा.

कोणताही फिटनेस रूटीन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला. ऑस्टियोपोरोसिस असलेल्या व्यक्तीसोबत फिरायला जाण्याचा प्रयत्न करा. अति व्यायाम आणि चुकीच्या पध्दतीने वाकणे टाळा कारण यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता वाढते आणि तुमची परिस्थिती आणखी बिघडू शकते. स्ट्रेचिंग्स आणि सक्रियता वाढवण्यासाठी आवश्यक असल्यास फिजिओथेरपिस्टची मदत घ्या.

(वाचा – Weight loss : 101 किलोच्या माणसाने इतक्या सोप्या पद्धतीने घटवलं तब्बल 25 किलो वजन, दिसू लागला एकदम तरूण..!))

​आहाराकडे लक्ष द्या

ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांनी दररोज ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्याचा आहारात समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ, पालक, कोबी, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य, टोफू, सोयाबीन, सॅल्मन, ट्यूना आणि अंडी यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळा.

कॅल्शियमने भरलेले अन्न खाल्ल्याने हाडांची घनता टिकून राहते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्या. ऑस्टियोपोरोसिस असलेल्या व्यक्तीला धूम्रपान, अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन कमी करावे लागेल. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की धूम्रपान केल्याने शरीराच्या कॅल्शियम शोषुन घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे हाडांची घनता कमी होते आणि हाडे कमकुवत होतात. धूम्रपानामुळे हाडे आणि शरीराच्या इतर ऊतींना रक्तपुरवठा कमी होतो.

(वाचा – Vat Purnima 2022 : चहा कॉफी न पिता, हे पदार्थ खाऊन सौभाग्यवतींनी सोडावा वटपौर्णिमेला उपवास))

​कोवळे ऊन घ्या

सकाळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास शरीरात व्हिटॅमिन डी तयार होऊ शकतो. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीला किमान 20 मिनिटे सूर्यप्रकाश घेण्यास प्रोत्साहित करा. असे करणे त्यांच्या हाडांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी देखील चांगले असू शकते.

(वाचा – Blood Sugar : डायबिटीजच्या रूग्णांसाठी Harvard हेल्थचा सल्ला, फक्त ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, आयुष्यभर वाढणार नाही ब्लड शुगर..!))

दुखापतींना प्रतिबंध घाला

ऑस्टियोपोरोसिस असलेल्यांना पडणे आणि फ्रॅक्चर होणे टाळण्यासाठी तसेच घरात चालताना आधाराकरिता हँडल आणि बार लावून घ्या जेणेकरुन पकड धरुन चालणे शक्य होईल. घरात कोणतेही गालिचे कारण या गोष्टींमुळे पाय निसटण्याची शक्यता असते. ओले जिन्यांवरुन चढ-उतर करणे टाळा कारण त्यामुळे पाय घसरुन फ्रॅक्चरची शक्यता वाढवू शकते. तसेच, सर्व खोल्या प्रकाशित राहतील, हवा खेळती राहील याची खात्री करा.

(वाचा – Facial Paralysis : जस्टिन बीबरला रामसे हंट सिंड्रोमची लागण, दुर्मिळ आजाराबद्दल जाणून घ्या ५ गोष्टी))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.