पुणे: पती-पत्नीच्या गप्पा सुरू असताना पत्नी वारंवार पाय हलवत होती. त्यामुळे पतीने पाय हलवू नको, असे सांगितले. त्यावर ‘मी तुमचे पाय बांधते, तुम्हाला बसता येईल का,’ असे म्हणून पत्नीने पतीचे पाय बांधले. त्यानंतर हात बांधून तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर डोळ्यावर कपडा बांधला आणि चाकूने पतीच्या हातावर, गळ्यावर वार करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (१६ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.
रुग्णाला घेऊन जायचयं, गाडी घेऊन ये; तरुणाला फोन आला, सकाळी निघाला मात्र नंतर जे घडलं त्यानं…
मिळालेल्या माहितीनुसार, विजयसिंह शहाजी गायकवाड (२८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे जखमी पतीचे नाव आहे. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयसिंह आणि त्यांची पत्नी घरात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी पत्नी सतत पाय हलवत होती. म्हणून विजयसिंह यांनी पत्नीला, ‘पाय हलवू नको,’असे बजावले. त्याचा पत्नीला राग आला. काही वेळाने पत्नीने विजयसिंह यांना ‘मी तुमचे पाय बांधते, तुम्ही तसेच बसून दाखवा,’ असे म्हटले. त्यासाठी विजयसिंह यांनी होकार दिला असता त्यांच्या पत्नीने त्यांचे हात, पाय दोरीने बांधले. तोंडावर चिकट टेप लावली.

ठाकरेंनी लोकसभेसाठी प्लॅन ठरला, पण पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारत अजितदादांचं टेन्शन वाढवलं!

त्यानंतर कपड्याने डोळे झाकले आणि त्यांच्या छातीवर बसून गळ्यावर आणि हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. आरोपी महिला आणि फिर्यादी यांचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. दोन महिन्यापूर्वी ते सांगली येथील गावाहून भोसरी येथे कामानिमित्त आले होते. फिर्यादी हे एका लॅबमध्ये काम करतात. तर, आरोपी पत्नी गृहिणी आहे. गप्पा मारताना पाय हलवण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *