राहुल गांधी उद्या 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर:छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थिती

राहुल गांधी उद्या 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर:छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थिती

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या शुक्रवारी कोल्हापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा होणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे 4 ऑक्टोबर सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान. प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – एस.पी. ऑफीस चौक – भगवा चौक, कसबा बावडा, सायंकाळी 6 वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता – हॉटेल सयाजी येथून राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी – कावळा नाका – दाभोळकर कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – दसरा चौक – राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, दु.1.30 वाजता – राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर , सायंकाळी 4 वाजता – हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

​काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या शुक्रवारी कोल्हापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा होणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे 4 ऑक्टोबर सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान. प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – एस.पी. ऑफीस चौक – भगवा चौक, कसबा बावडा, सायंकाळी 6 वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता – हॉटेल सयाजी येथून राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी – कावळा नाका – दाभोळकर कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – दसरा चौक – राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, दु.1.30 वाजता – राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर , सायंकाळी 4 वाजता – हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.  

हिंदूंमध्ये फूट पाडून त्यांना कमकुवत करतेय काँग्रेस- आसाम CM:मुस्लिमांमध्ये फूट पाडून दाखवा, देशाच्या कानाकोपऱ्यात लपलेत बाबर, त्यांना बाहेर काढा

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पलवल येथे पोहोचलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास राज्याचे काय होईल, हे हातीन आणि नूहमधील काँग्रेस उमेदवारांच्या रॅलीत लागलेल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांनी सिद्ध झाले. पिता-पुत्राचे सरकार स्थापन झाले तर हा पाकिस्तान झिंदाबाद इथे नाही तर पलवल आणि नंतर संपूर्ण हरियाणामध्ये पसरेल. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस हिंदूंमध्ये फूट पाडून...

जे खटाखट म्हणायचे ते सफाचट झाले- योगी:म्हणाले- ​​​​​​​काँग्रेस चंड-मुंड आणि महिषासुर; डबल इंजिन सरकार देवाचा संदेश घेऊन आले

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहबाद येथे पोहोचले. भाजपचे उमेदवार सुभाष कलसाणा यांच्या निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी ते येथे आले होते. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले – ‘खटाखट-खटाखट’ म्हणणारे राहुल गांधी मैदान सोडून आज ‘सफाचट’ झाले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसला...

ठाकरे गटाची डॉन अरुण गवळीच्या मुलीला उमेदवारी?:मिलिंद नार्वेकर यांनी घेतली भेट, यामिनी जाधवांना भायखळ्यात आव्हान देण्याची चर्चा

ठाकरे गटाची डॉन अरुण गवळीच्या मुलीला उमेदवारी?:मिलिंद नार्वेकर यांनी घेतली भेट, यामिनी जाधवांना भायखळ्यात आव्हान देण्याची चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याच्या विविध ठिकाणी नेत्यांच्या सभा तसेच दौरे सुरू झाले आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांचे देखील संधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे महायुती सरकारचे सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. तसेच गीता गवळी देखील भायखळा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर गीता गवळी यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गीता गवळी या त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका देखील होत्या, तसेच त्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील राहिल्या आहेत. दक्षिण मुंबईमध्ये अरुण गवळी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला गीता गवळी यांचा फायदा होऊ शकतो. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. अशात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. पुणे येथील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील भाजप पक्षाला रामराम करत महाविकास आघाडीत जाऊन तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याच्या विविध ठिकाणी नेत्यांच्या सभा तसेच दौरे सुरू झाले आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांचे देखील संधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे महायुती सरकारचे सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. तसेच गीता गवळी देखील भायखळा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर गीता गवळी यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गीता गवळी या त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका देखील होत्या, तसेच त्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील राहिल्या आहेत. दक्षिण मुंबईमध्ये अरुण गवळी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला गीता गवळी यांचा फायदा होऊ शकतो. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. अशात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. पुणे येथील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील भाजप पक्षाला रामराम करत महाविकास आघाडीत जाऊन तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.  

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची बोटे छाटली:मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब योग्यवेळी सेटल केला जाईल, अंबादास दानवे यांचा इशारा

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची बोटे छाटली:मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब योग्यवेळी सेटल केला जाईल, अंबादास दानवे यांचा इशारा

फेसबुकवर भाजप नेत्याविषयी केलेल्या एका कथित वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याची भयंकर घटना नांदेडच्या लोह्यात घडली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, या घटनेचा योग्यवेळी ‘हिशेब सेटल’ करण्याचा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर स्थिती अतिशय संवेदनशील बनली आहे. यामुळे किरकोळ कारणांवरुन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद उद्भवत आहेत. त्याची प्रचिती नांदेडच्या लोहा तालुक्यात आली आहे. लोह्याचे ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट वडवळे यांची बोटेच छाटून टाकली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, भाजप पदाधिकाऱ्यांनी संतोष नांदेड शहरापासून जवळच असलेल्या तुप्पा शिवारातील एका धाब्यावरून संतोष वडवळे यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी वडवळे यांची 2 बोटे छाटून टाकली. या हल्ल्याची माहिती मिळताच वडवळे यांचे कुटुंबीय व ठाकरे गटाच्या त्यांना लगतच्या एका रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. देवेंद्र जी, तुमच्या या चेल्यांना आवरा. एखाद्या सोशल मीडिया पोस्ट वरून अशी मारहाण करणे कोणत्या बौध्दिकात शिकवले जाते? आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल आणि योग्यवेळी तो सेटल पण केला जाईल. तुमचे कार्यकर्ते नांदेड आणि इथले लोक आपली जागिर समजत असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात हिंडत आहेत, असे दानवे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. आता पाहू काय आहे प्रकरण? लोहा येथील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी नांदेडचे पार्सल चिखलीला आले आणि लोह्याचे पार्सल आता चिखलीला पाठवायचंय, असे नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट भाजपचे स्थानिक नेते तथा माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उद्देशून असल्याचे सांगितले जात आहे. पोस्टमुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

​फेसबुकवर भाजप नेत्याविषयी केलेल्या एका कथित वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याची भयंकर घटना नांदेडच्या लोह्यात घडली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, या घटनेचा योग्यवेळी ‘हिशेब सेटल’ करण्याचा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर स्थिती अतिशय संवेदनशील बनली आहे. यामुळे किरकोळ कारणांवरुन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद उद्भवत आहेत. त्याची प्रचिती नांदेडच्या लोहा तालुक्यात आली आहे. लोह्याचे ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट वडवळे यांची बोटेच छाटून टाकली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, भाजप पदाधिकाऱ्यांनी संतोष नांदेड शहरापासून जवळच असलेल्या तुप्पा शिवारातील एका धाब्यावरून संतोष वडवळे यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी वडवळे यांची 2 बोटे छाटून टाकली. या हल्ल्याची माहिती मिळताच वडवळे यांचे कुटुंबीय व ठाकरे गटाच्या त्यांना लगतच्या एका रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. देवेंद्र जी, तुमच्या या चेल्यांना आवरा. एखाद्या सोशल मीडिया पोस्ट वरून अशी मारहाण करणे कोणत्या बौध्दिकात शिकवले जाते? आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल आणि योग्यवेळी तो सेटल पण केला जाईल. तुमचे कार्यकर्ते नांदेड आणि इथले लोक आपली जागिर समजत असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात हिंडत आहेत, असे दानवे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. आता पाहू काय आहे प्रकरण? लोहा येथील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी नांदेडचे पार्सल चिखलीला आले आणि लोह्याचे पार्सल आता चिखलीला पाठवायचंय, असे नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट भाजपचे स्थानिक नेते तथा माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उद्देशून असल्याचे सांगितले जात आहे. पोस्टमुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण:शाळेच्या अध्यक्षांसह सचिवांना जामीन, पण पोलिसांनी लगेच दुसऱ्या प्रकरणात केली अटक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण:शाळेच्या अध्यक्षांसह सचिवांना जामीन, पण पोलिसांनी लगेच दुसऱ्या प्रकरणात केली अटक

बदलापूर अत्याचार प्रकरणील फरार असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल पोलिसांनी कर्जतमधून अटक केली. दोन्ही आरोपींना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही आरोपींना न्यायालयाने कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने 25 हजार रुपयांच्या जात मुचल्यावर जामीन मंजुरही केला. मात्र दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे जामीन मिळूनही आरोपींना कोठडीतच रहावे लागणार आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुली असल्यामुळे या सहआरोपींवर दोन एफआयआर दाखल होते. एका पीडितेच्या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळाला. तर दुसऱ्या पीडितेच्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात नेमके काय घडले? पोलिसांनी आम्हाला काल ताब्यात घेतले होते आणि आज चौकशी करुन अटक केली, असा युक्तीवाद आरोपी उदय कोतवाल यांनी न्यायालयात मांडला. त्यानंतर सरकारी वकील म्हणाले की, शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याध्यापकांनी या दोघांना कळवले होते. सीसीटीव्ही फुटेज का मिळाले नाहीत, आरोपी अक्षय शिंदेला कामावर नेमताना नोंद केली होती का? या सर्व बाबींचा तपास करायचा आहे. कलम 65(2) तसेच काही अतिरिक्त कलम वाढवली आहेत, असे सरकारी वकील म्हणाले. अक्षय शिंदे आणि या आरोपींचे काही संबंध आहेत का? याचा तपास करायचा आहे. यासाठी आरोपींना आम्ही मेल आणि व्हॉट्सअॅपवर चौकशासाठी नोटीस पाठवली होती. पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावर आरोपींचे वकील म्हणाले की, सीसीटीव्हीचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून होत होते. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग न होण्यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. माझ्या आशिलाचा शाळेशी रोज संबंध येत नाही.
दरम्यान आरोपींनी तपास कामात सहकार्य केले नाही. तसेच आरोपींचे घटनेतील वर्तण पाहून कारवाई करता येते. घटनेची गंभीरता पाहता अशा प्रकरणात विशेष करुन निर्णय देता येतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. हेही वाचा… आरोपीच्या हातातील बेड्या काढल्या होत्या का‌?:पोस्टमार्टमचा रिपोर्ट कुठे आहे? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करत एन्काउंटरची चौकशी करावी, या मागणीसाठी शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? अक्षय शिंदेनी झाडलेल्या गोळ्या नेमकी कुठे गेल्या? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? असे अनेक प्रश्न विचारले. पूर्ण बातमी वाचा…

​बदलापूर अत्याचार प्रकरणील फरार असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल पोलिसांनी कर्जतमधून अटक केली. दोन्ही आरोपींना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही आरोपींना न्यायालयाने कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने 25 हजार रुपयांच्या जात मुचल्यावर जामीन मंजुरही केला. मात्र दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे जामीन मिळूनही आरोपींना कोठडीतच रहावे लागणार आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुली असल्यामुळे या सहआरोपींवर दोन एफआयआर दाखल होते. एका पीडितेच्या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळाला. तर दुसऱ्या पीडितेच्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात नेमके काय घडले? पोलिसांनी आम्हाला काल ताब्यात घेतले होते आणि आज चौकशी करुन अटक केली, असा युक्तीवाद आरोपी उदय कोतवाल यांनी न्यायालयात मांडला. त्यानंतर सरकारी वकील म्हणाले की, शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याध्यापकांनी या दोघांना कळवले होते. सीसीटीव्ही फुटेज का मिळाले नाहीत, आरोपी अक्षय शिंदेला कामावर नेमताना नोंद केली होती का? या सर्व बाबींचा तपास करायचा आहे. कलम 65(2) तसेच काही अतिरिक्त कलम वाढवली आहेत, असे सरकारी वकील म्हणाले. अक्षय शिंदे आणि या आरोपींचे काही संबंध आहेत का? याचा तपास करायचा आहे. यासाठी आरोपींना आम्ही मेल आणि व्हॉट्सअॅपवर चौकशासाठी नोटीस पाठवली होती. पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावर आरोपींचे वकील म्हणाले की, सीसीटीव्हीचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून होत होते. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग न होण्यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. माझ्या आशिलाचा शाळेशी रोज संबंध येत नाही.
दरम्यान आरोपींनी तपास कामात सहकार्य केले नाही. तसेच आरोपींचे घटनेतील वर्तण पाहून कारवाई करता येते. घटनेची गंभीरता पाहता अशा प्रकरणात विशेष करुन निर्णय देता येतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. हेही वाचा… आरोपीच्या हातातील बेड्या काढल्या होत्या का‌?:पोस्टमार्टमचा रिपोर्ट कुठे आहे? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करत एन्काउंटरची चौकशी करावी, या मागणीसाठी शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? अक्षय शिंदेनी झाडलेल्या गोळ्या नेमकी कुठे गेल्या? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? असे अनेक प्रश्न विचारले. पूर्ण बातमी वाचा…  

माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत:अक्षय शिंदेच्या वकिलाचा धक्कादायक दावा, सुरक्षेची केली मागणी

माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत:अक्षय शिंदेच्या वकिलाचा धक्कादायक दावा, सुरक्षेची केली मागणी

बदलापूर अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचे धमक्या येत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?
अमित कटारनवरे म्हणाले, आम्हाला सतत धमक्या सुरू आहेत. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे आम्हाला सेक्युरिटी मिळायबी या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात राजकीय वास असल्याचे दिसत आहे. मात्र यावर आता बोलणे घाईचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अमित कटारनवरे म्हणाले, हे सर्व प्रकरण न्यायालयात आल्यानंतर प्रकरणातील सर्वांना अटक होत आहे आणि अक्षय शिंदेची अंत्ययात्रा देखील न्यायालयामुळेच झाली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना कर्जत येथून अटक झाली, त्यांना समजले होते की आता अटकपूर्व जामीन शक्य नाही. त्यामुळे हा राजकीय खेळ करण्यात आल्याचा आरोप अमित कटारनवरे यांनी केला आहे. न्यायालयाने उपस्थित केले अनेक प्रश्न
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी वकील अमित कटारनवरे यांना अनेक प्रश्न विचारले. पोलिस तपास करत आहेत, पण तुम्ही प्रसिद्धीकरिता बाहेर जाऊन एन्काउंटरच्या घटनास्थळी तपास कसे करू शकता का? अशा शब्दांत न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना सुनावले. अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? बंदुकीचे फिंगर प्रिंट बदलण्यात आले आहेत का? असे अनेक प्रश्न न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर सरकारी वकिलांनी ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली असल्याची माहिती दिली.

​बदलापूर अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचे धमक्या येत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?
अमित कटारनवरे म्हणाले, आम्हाला सतत धमक्या सुरू आहेत. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे आम्हाला सेक्युरिटी मिळायबी या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात राजकीय वास असल्याचे दिसत आहे. मात्र यावर आता बोलणे घाईचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अमित कटारनवरे म्हणाले, हे सर्व प्रकरण न्यायालयात आल्यानंतर प्रकरणातील सर्वांना अटक होत आहे आणि अक्षय शिंदेची अंत्ययात्रा देखील न्यायालयामुळेच झाली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना कर्जत येथून अटक झाली, त्यांना समजले होते की आता अटकपूर्व जामीन शक्य नाही. त्यामुळे हा राजकीय खेळ करण्यात आल्याचा आरोप अमित कटारनवरे यांनी केला आहे. न्यायालयाने उपस्थित केले अनेक प्रश्न
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी वकील अमित कटारनवरे यांना अनेक प्रश्न विचारले. पोलिस तपास करत आहेत, पण तुम्ही प्रसिद्धीकरिता बाहेर जाऊन एन्काउंटरच्या घटनास्थळी तपास कसे करू शकता का? अशा शब्दांत न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना सुनावले. अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? बंदुकीचे फिंगर प्रिंट बदलण्यात आले आहेत का? असे अनेक प्रश्न न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर सरकारी वकिलांनी ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली असल्याची माहिती दिली.  

CP अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना:श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सव आयोजित

CP अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना:श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सव आयोजित

माता माता की जय… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक घटस्थापना केली. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावटीसह विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. घटस्थापनेचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांनी केले. अमिता अग्रवाल म्हणाल्या, दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे. याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय आहे.

​माता माता की जय… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक घटस्थापना केली. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावटीसह विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. घटस्थापनेचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांनी केले. अमिता अग्रवाल म्हणाल्या, दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे. याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय आहे.  

गांधी हत्येमुळे सावरकर, ब्राह्मण अन् हिंदुत्व बदनाम झाले:अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा; डॉक्टर दा. वि. नेने स्मृती पुरस्काराने सन्मान

गांधी हत्येमुळे सावरकर, ब्राह्मण अन् हिंदुत्व बदनाम झाले:अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा; डॉक्टर दा. वि. नेने स्मृती पुरस्काराने सन्मान

नथुराम गोडसेने ३० जानेवारी, १९४८ ला महात्मा गांधींची हत्या केली आणि त्यामुळे ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले, असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी केले. पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे अभिनेते शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पोंक्षे म्हणाले की, सन १९४६ पासून सावरकर सांगतात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकद वाढत होती. अशा परिस्थितीत आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता व ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला तो नथुराम गोडसे यांनी. गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली. ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले. एका दैदिप्यमान अशा कारकीर्दीवर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. सावरकरांना गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. कोर्टात निर्दोष सुटून आजही काँग्रेसचे असे नेते जे स्वतः पुराव्याअभावी जामिनावर जेलबाहेर आहेत, ते नेते सावरकर गांधी हत्येत सहभागी होते परंतु पुराव्याअभावी सुटले असा कांगावा करत असतात, असे शरद पोंक्षे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा काँग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार असे म्हणतो तेव्हा फार गंमत वाटते. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी काँग्रेसला त्यांच्यावर चिखलफेक करण्याची इच्छा होते. यावरूनच आजही त्यांच्यावर असलेली सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.” स्वातंत्रपूर्व काळात १९३७ साली निर्बंधांमधून मुक्त झाल्यावर सावरकरांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते. बऱ्याच भारतीयांना वाटत होते की, सावरकर आता काँग्रेसमध्ये जाऊन गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. परंतु काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेले पराकोटीचे मुस्लीमांचे लांगुनचालन यामुळे सावरकरांनी सदर प्रस्तावास नकार दिला. मोठ्या प्रमाणात विजयी इतिहास असताना देखील आम्हाला कायमच आमच्या पराभवाचा इतिहास शिकवला जातो. आम्ही जर इतके जास्त वेळा पराभूत झाले असतो, तर आज हिंदू म्हणून जगू शकलो नसतो, असे परखड मतही शरद पोंक्षे यांनी यावेळी मांडले.

​नथुराम गोडसेने ३० जानेवारी, १९४८ ला महात्मा गांधींची हत्या केली आणि त्यामुळे ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले, असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी केले. पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे अभिनेते शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पोंक्षे म्हणाले की, सन १९४६ पासून सावरकर सांगतात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकद वाढत होती. अशा परिस्थितीत आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता व ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला तो नथुराम गोडसे यांनी. गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली. ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले. एका दैदिप्यमान अशा कारकीर्दीवर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. सावरकरांना गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. कोर्टात निर्दोष सुटून आजही काँग्रेसचे असे नेते जे स्वतः पुराव्याअभावी जामिनावर जेलबाहेर आहेत, ते नेते सावरकर गांधी हत्येत सहभागी होते परंतु पुराव्याअभावी सुटले असा कांगावा करत असतात, असे शरद पोंक्षे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा काँग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार असे म्हणतो तेव्हा फार गंमत वाटते. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी काँग्रेसला त्यांच्यावर चिखलफेक करण्याची इच्छा होते. यावरूनच आजही त्यांच्यावर असलेली सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.” स्वातंत्रपूर्व काळात १९३७ साली निर्बंधांमधून मुक्त झाल्यावर सावरकरांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते. बऱ्याच भारतीयांना वाटत होते की, सावरकर आता काँग्रेसमध्ये जाऊन गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. परंतु काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेले पराकोटीचे मुस्लीमांचे लांगुनचालन यामुळे सावरकरांनी सदर प्रस्तावास नकार दिला. मोठ्या प्रमाणात विजयी इतिहास असताना देखील आम्हाला कायमच आमच्या पराभवाचा इतिहास शिकवला जातो. आम्ही जर इतके जास्त वेळा पराभूत झाले असतो, तर आज हिंदू म्हणून जगू शकलो नसतो, असे परखड मतही शरद पोंक्षे यांनी यावेळी मांडले.  

वाडिया महाविद्यालय लैंगिक शोषण प्रकरण:पोलिसांची संशयास्पद भूमिका, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पीडित पक्षाचा आरोप

वाडिया महाविद्यालय लैंगिक शोषण प्रकरण:पोलिसांची संशयास्पद भूमिका, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पीडित पक्षाचा आरोप

पुण्यातील नामांकित वाडिया महाविद्यालयात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल हाेऊन दाेन आराेपींना अटक करण्यात आली. परंतु तपासात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आराेप पीडित मुलीच्या वकिलांनी केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे पूर्वीचे ओएसडी असलेले वाडिया महाविद्यालयाचे संस्थाचालक सचिन सानप यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून या प्रकरणात महाविद्यालयाचे नाव समोर आले नाही पाहिजे अशी तंबी दिली. संस्थाचालक यांना या प्रकरणात आरोपी करणे गरजेचे आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या जबाबतून विविध स्वरूपाची माहिती समोर आली असून पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाच्या व्यतिरिक्त आणि गोष्टी समोर येत असून त्या लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप पीडित मुलीचे कुटुंबीयाचे वकील अश्विन भागवत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. वकील अश्विन भागवत म्हणाले, सहा सप्टेंबर पूर्वी तीनवेळा पीडित मुलीसाेबत घटना घडल्या हाेत्या. अल्पवयीन मुले व सज्ञान आराेपी यांनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते सर्वत्र साेशल मिडियावर व्हायरल केले हाेते. प्रशासनाकडे याबाबत सर्व माहिती हाेती. तिचे वडील त्याच महाविद्यालयात प्राध्यापक असून त्याबाबतची माहिती त्यांना जाणीवपूर्वक दिली गेली नाही. १२ सप्टेंबर राेजी पुन्हा मुलीवर अत्याचार हाेऊन त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यानंतर 21 सप्टेंबर राेजी महाविद्यालयास जाग येऊन त्यांनी कारवाई करण्यास घेतली. परंतु पीडित मुलीचीच चूक आहे असे भासवून तिला काॅलेज बाहेर काढण्याचा व हे प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. २३ सप्टेंबर राेजी मुलीचे वडील आक्रमक झाल्यावर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. परंतु त्यानंतर १० ते १२ दिवस उलटूनही अद्याप पिडित मुलीच्या आई -वडिलांचे जबाब पाेलिसांकडून नाेंदविण्यात आले नाहीत. पाेलिस ठाण्यात सहकार्य मिळत नाही. आम्हाला संशय आहे की, या प्रकरणात कुणीतरी दबाव टाकत असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही पत्रकार परीषद घेणार म्हटल्यावर पाेलिसांनी मुलीच्या आई-वडिलांचे जबाब घेण्यास बाेलावले आणि जबाब घेतला. तसेच १६४ प्रमाणे मुलीचा जबाब नाेंदविण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार गुरुवारी तिचा जबाब घेण्यात आला. पण ज्या गतीने या प्रकरणाचा तपास हाेणे अपेक्षित हाेते तसे होत नाही. काेणत्यातरी दबावामुळे तपासात दिरंगाई हाेत आहे. या गुन्ह्याचा पारदर्शक तपास करण्याची गरज आहे. हे प्रकरण पॉक्सो असूनही ते विशाखा समिती समोर घेण्यात आले नाही. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर पुढील अनर्थ टळला असता, असेही अश्विन भागवत यावेळी बोलताना म्हणाले. —

​पुण्यातील नामांकित वाडिया महाविद्यालयात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल हाेऊन दाेन आराेपींना अटक करण्यात आली. परंतु तपासात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आराेप पीडित मुलीच्या वकिलांनी केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे पूर्वीचे ओएसडी असलेले वाडिया महाविद्यालयाचे संस्थाचालक सचिन सानप यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून या प्रकरणात महाविद्यालयाचे नाव समोर आले नाही पाहिजे अशी तंबी दिली. संस्थाचालक यांना या प्रकरणात आरोपी करणे गरजेचे आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या जबाबतून विविध स्वरूपाची माहिती समोर आली असून पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाच्या व्यतिरिक्त आणि गोष्टी समोर येत असून त्या लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप पीडित मुलीचे कुटुंबीयाचे वकील अश्विन भागवत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. वकील अश्विन भागवत म्हणाले, सहा सप्टेंबर पूर्वी तीनवेळा पीडित मुलीसाेबत घटना घडल्या हाेत्या. अल्पवयीन मुले व सज्ञान आराेपी यांनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते सर्वत्र साेशल मिडियावर व्हायरल केले हाेते. प्रशासनाकडे याबाबत सर्व माहिती हाेती. तिचे वडील त्याच महाविद्यालयात प्राध्यापक असून त्याबाबतची माहिती त्यांना जाणीवपूर्वक दिली गेली नाही. १२ सप्टेंबर राेजी पुन्हा मुलीवर अत्याचार हाेऊन त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यानंतर 21 सप्टेंबर राेजी महाविद्यालयास जाग येऊन त्यांनी कारवाई करण्यास घेतली. परंतु पीडित मुलीचीच चूक आहे असे भासवून तिला काॅलेज बाहेर काढण्याचा व हे प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. २३ सप्टेंबर राेजी मुलीचे वडील आक्रमक झाल्यावर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. परंतु त्यानंतर १० ते १२ दिवस उलटूनही अद्याप पिडित मुलीच्या आई -वडिलांचे जबाब पाेलिसांकडून नाेंदविण्यात आले नाहीत. पाेलिस ठाण्यात सहकार्य मिळत नाही. आम्हाला संशय आहे की, या प्रकरणात कुणीतरी दबाव टाकत असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही पत्रकार परीषद घेणार म्हटल्यावर पाेलिसांनी मुलीच्या आई-वडिलांचे जबाब घेण्यास बाेलावले आणि जबाब घेतला. तसेच १६४ प्रमाणे मुलीचा जबाब नाेंदविण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार गुरुवारी तिचा जबाब घेण्यात आला. पण ज्या गतीने या प्रकरणाचा तपास हाेणे अपेक्षित हाेते तसे होत नाही. काेणत्यातरी दबावामुळे तपासात दिरंगाई हाेत आहे. या गुन्ह्याचा पारदर्शक तपास करण्याची गरज आहे. हे प्रकरण पॉक्सो असूनही ते विशाखा समिती समोर घेण्यात आले नाही. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर पुढील अनर्थ टळला असता, असेही अश्विन भागवत यावेळी बोलताना म्हणाले. —