भाजपचे तिकीट हवे असल्याने माझी गळचेपी:अमोल बालवडकर यांचा आरोप; चंद्रकांत पाटलांच्या एकाधिकारशाहीला विरोध
कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी हवी असल्यामुळे माझी भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गुरुवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. माझी कोथरूड विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. मी मागील दहा वर्षांपासून पक्षात प्रामाणिक काम करत आहे. मी माझ्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचे वरिष्ठ कोण हे सध्या समजत नाही. मी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजल्यापासून मागील दोन महिन्यांपासून पक्षात मला बहिष्कृतपणाची वागणूक मिळत आहे. माझ्या कार्यकर्त्यांचीही गळचेपी केली जात आहे. माझ्या कार्यक्रमांना कोणी नेते येऊ दिले जात नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्याविषयी माझ्या मनात आजवर खूप आदर होता. पण आता तो निघून गेला आहे, असे अमोल बालवडकर यांनी म्हटले आहे. अमोल बालवडकर म्हणाले, एक कार्यकर्ता म्हणून मी आज पत्रकार परिषदेत बोलत आहे. कार्यकर्ता हा निडर असावा आणि चुकीच्या गोष्टी बोलणारा नसावा. पुणे शहरात निरीक्षक यांची बैठक पार पडली. निरीक्षक यांच्या उपस्थितीत लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. अनेक मोठे नेते पक्षात होऊन गेले, पण पक्षात केवळ ठराविक लोकांना निरोप दिले गेले. इच्छुक उमेदवार म्हणून माझे आणि श्याम देशपांडे यांची नावे चिठ्ठीत लिहू नये केवळ चंद्रकांत पाटील यांचे नाव लिहिण्यात यावे असे निरीक्षक बैठकपूर्वी सांगण्यात आले. काही जणांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. मला तिकीट दिले नाही तरी चालेल, पण अशाप्रकारे कटू राजकारण करणे योग्य नाही. प्रत्येकाचा आत्मसन्मान दुखावला जात असेल तर कार्यकर्त्यांनी न्याय कुठे मागायचा? पक्षावर माझा विश्वास आहे, पण काही लोक पक्ष स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर यांनी यापूर्वी तिकीट मागितले, पण त्यांना ही वागणूक दिली गेली नाही. पक्षाबाबत माझी नाराजी नाही, पण काहीजण चुकीची पद्धत चालवत आहेत. ते बरोबर नाही. पक्ष निरीक्षक यांचा अहवाल गोपनीय असतो. पण चंद्रकांत पाटील यांचे नाव एकतर्फी चालवले जात असून प्रसारमाध्यम यांच्यापर्यंत पोहचवले जात आहे. लोकशाही नसेल तर निरीक्षक सर्वेक्षण बंद करावे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार देऊन ही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. मतदारसंघात मी 35 हजार नागरीक यांचा सर्व्हे एक महिन्यात केला असून त्यांची मते मला आमदारकी मिळावी यासाठी आहे. खरा सर्व्हे हा जनतेचा असतो. माझ्यावर काही जणांकडून अन्याय होत आहे. मी भाजप मध्येच राहणार असून मला विश्वास आहे की, कोथरूड मध्ये मलाच उमेदवारी मिळेल, असेही बालवडकर यावेळी बोलताना म्हणाले.