मुख्यमंत्रिपद हवेच म्हणून काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्यास उद्धवसेना तयार:मविआत काँग्रेसचा 105 तर शरद पवार गटाचा 88 जागांचा प्रस्ताव
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद हवेच, हा आग्रह नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. प्रत्यक्षात त्यांनी हा आग्रह अजिबात सोडलेला नाही, असे मविआच्या जागावाटप बैठकीत स्पष्ट झाले. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा १० जागा कमी घेण्याची तयारी उद्धवसेनेने जागावाटप बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी दाखवली. काँग्रेसने १०५, उद्धवसेनेने ९५ आणि शरद पवार गटाने ८८ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव त्यात मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत जागावाटपावर चर्चा झालीच नाही, असा दावा केला. आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे. दरम्यान, बैठकीला येण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगपाखड केली. मविआतील नेत्यांनी २८८ जागांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे. उद्धवसेना मुंबईसह कोकणात तर राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलच बहुमत मिळेल, असे प्रास्ताविक करून सुरूवात झाली. काँग्रेसने ११५ जागांवर दावा केला आहे. मात्र, राहुल गांधींच्या आदेशानुसार ते १०५ जागांवर थांबतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे नेते फारच व्यग्र, तारखांवर तारखा देत आहेत जागा वाटप बैठकीची तारीख, वेळ, ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले. तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत. उद्धवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसले सूत्रांनी सांगितले की, ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान उद्धव यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदासाठी माझाच चेहरा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर प्रचारात ही बाब समोर आणली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची घाई नाही, असे म्हटले. त्यामुळे शांत झालेली उद्धवसेना या बैठकीत आक्रमक झाल्याचे दिसले. जागावाटपावर ठोस चर्चा झालीच नाही : पटोले राहुल गांधींविषयीच्या वक्तव्यांवर राज्यभर आंदोलन करण्याचे बुधवारच्या बैठकीत ठरले. जागा वाटपावर ठोस चर्चा झाली नाही. आठ दिवसानंतर ती होईल. मुंबईतील ९ जागांवर अद्याप एकमत झाले नाही. – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस पाच वर्षांत २९ जागा कमी २०१९मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजपने युती म्हणून विधानसभा लढली होती. त्यात शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. आता मविआमध्ये उद्धव ठाकरे २४ कमी जागा लढण्यास तयार आहेत. काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांचा वाढता विरोध राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले असले तरी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते त्यास अजिबात तयार नाही. मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव यांचा अनुभव चांगला नव्हता. महत्वाचे म्हणजे लोकसभेला उद्धवसेनेचे खासदार मुस्लिम आणि दलितांनी एकगठ्ठा मतदान केल्यानेच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद कशाला, असे नेत्यांचे म्हणणे आहे.