मुंबई : अफगाणिस्तानच्या संघाने आता पाकिस्तानत्या संघाला चांगलीच धडकी भरवली आहे. त्यामुळे आता सेमी फायनलच्या समीकरणात मोठा बदल होणार असल्याचे आता समोर येत आहे.अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या इब्राहिम झारदाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. झारदानने यावेळी वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला. कारण यापूर्वी अफगाणिस्तानच्या एकाही खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावता आले नव्हते. वर्ल्ड कपमध्ये देशाकडून पहिले शतक झळकावले ते झारदानने. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रहार करत झारदानने ८ चौकार आणि ३ षटाकारांच्या जोरावर नाबाद १२९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांचा डोंगर उभारता आला आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला धडकी भरली आहे. कारण अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ही मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या विजयाची शक्यता आला जास्त झाली आहे. कारण अफगाणिस्तानची गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. त्यामुळे ते या धावसंख्येचा बचाव करून विजय मिळवू शकतात. जर अफगाणिस्तानच्या संघाने विजय मिळला तर पॉइंट्स टेबलमधील गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकते. अफगाणिस्तानने आपल्या विजयाचा पाया रचला आहे, असे आता म्हटले जात आहे. पण ते विजय मिळवणार का, हे पाहावे लागेल. त्याचबरोबर जर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजय साकारला तर त्यांचे सेमी फायनलमधील तिकीट बूक होऊ शकते. त्यामुळे या सामन्यात कोणात्याही संघाचा विजय झाला तरी पाकिस्तानला धक्का बसू शकतो. पण अफगाणिस्तानने विजय साकारला तर पाकिस्तानला जास्त धक्का बसू शकतो. त्यामुळे या विजयानंतर नेमकं काय होणार हे पॉइंट्स टेबलमध्ये काय घडतं यावर ठरणार आहे. पण या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल होणार हे मात्र नक्की. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सेमी फायनलच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजय मिळवतो, हे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.