कोलकाता: गुरुवारी बंगळुरूमध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान एकदि

वसीय विश्वचषक २०२३ मधून अक्षरशः बाहेर पडण्याचा मार्गावर आला. यावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची चांगलीच मजा घेतली आहे. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी विश्वचषक खेळायला आलेल्या बाबर सेनेने पहिले दोन सामने जिंकले होते आणि नंतर रोहितच्या संघाने त्यांना वाईट रीतीने पराभूत केल्यानंतर पाकिस्तानच्या पराभवांचा सिलसिला सुरु झाला. यानंतर बाबरच्या संघाने अफगाणिस्तानला हरवून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी मिळवली.

मुलतानचा सुलतान म्हटल्या जाणार्‍या वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्रोल केले. बाय बाय पाकिस्तानचे पोस्टर पोस्ट करत पाकिस्तान जिंदा भाग… अशी पोस्ट त्याने केली आहे. पाकिस्तानचा शेवटचा गट सामना शनिवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंडशी होणार आहे. दुसरीकडे, मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, बाबर आझमलाही घरी पोहोचल्यानंतर त्यालाही अनेकांच्या उत्तराला सामोरे जावे लागणार आहे.

२०२३ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्य झाले आहे. सेहवागने एक क्रिएटिव्ह पोस्ट केली, ज्यामध्ये लिहिले होते- गुडबाय, अलविदा, पाकिस्तान. सेहवागने विनोदी स्वरात त्यांना सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे ट्विट होते- पाकिस्तान जिंदाभाग! सुरक्षितपणे घरी जा. सेहवागच्या पोस्टवर अनेक जबरदस्त कमेंट्सही आल्या आहेत. X वर ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

त्याचबरोबर सेहवागने पाकिस्तानला सुद्धा धारेवर धरले. सेहवागने ट्विट करत म्हणाला, ‘पाकिस्तानला जो संघ पाठिंबा द्यायला जातो, तो संघही त्यांच्यासारखाच खेळायला लागतो ही पाकिस्तान संघाची खासियत आहे.’ आणि हसण्याचे ईमोजी ऍड करत पुढे सेहवागने श्रीलंकेला सॉरीसुद्धा म्हटले.

न्यूझीलंडने श्रीलंकेवर १६० चेंडू राखून पाच गडी राखून मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट (NRR) +०.७४३ वर गेला आहे. या विजयाने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. न्यूझीलंडने गुरुवारी बेंगळुरूमध्ये श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवून भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह विश्वचषक उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *