मुंबई : भारताने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाचे सर्वच कौतुक करत आहेत. पण पाकिस्तानच्या खेळाडूने मात्र एक व्हिडिओ दाखवत रोहित शर्मा हा टॉसच्यावेळी चिटींग करत असल्याचे म्हटले आहे.आतापर्यंत रोहितने वर्ल्ड कपमध्ये बरेच टॉस जिंकले आहेत. टॉस जिंकला म्हणजे सामना जिंकता येतो, असे काही जणांना वाटते. त्यामुळे टॉस हाच सामन्याचा बॉस असतो, असे काही जणांना वाटते. त्यामुळे रोहित टॉसच्या वेळी चिटींग करतो आणि त्यामुळेच त्यांना सामने जिंकता येत आहेत, असे म्हटले जात आहे. पाकिस्तानच्या खेळाडूने एका टीव्ही चॅनेलवर बोलताना रोहित टॉस करताना चिटींग करतो, असे म्हटले आहे. या गोष्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रोहित शर्मा टॉसच्या वेळी नेमकं काय करतो, हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.सिकंदर यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे की, ” रोहित ज्या पद्धतीने टॉसच्या वेळी नाणे उडवतो ते पाहून आश्चर्य वाटत आहे. कारण टॉसच्या वेळी रोहित हा सर्वात लांब नाणे उडवतो. वर्ल्ड कपमधील बाकीचे कर्णधारही टॉसला येतात, पण ते रोहितएवढे लांब नाणे उडवत नाहीत. रोहित जेव्हा लांब नाणे उडवतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला नेमका काय कौल लागला आहे हे दिसत नाही, याचं कारण नेमकं आहेत तरी काय…” सिंकदर यांना म्हणाये आहे की, रोहित हा टॉसच्या वेळी नाणं फार लांब उडवतो, त्यामुळे त्याच्याबरोबर असलेल्या कर्णधाराला नेमका काय कौल आहे हे कळत नाही, यामध्ये काही तरी गोलमाल तर नाही नाही ना, रोहित शर्मा टॉसच्या वेळी ही चिटींग करतो का, असे या माध्यमातून सिकंदर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिकंदर यांच्या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पण ही गोष्ट तेवढी गंभीरपणे घेण्याची गरज नाही. कारण ही गोष्ट त्यांनी मस्करीमध्ये म्हटली असली तरी काही जणं त्याचा गंभीरपणे अर्थ काढताना दिसत आहेत आणि त्याचा संबंध भारताच्या विजयाशी जोडत आहेत.रोहितचा या टॉसचे व्हिडिओ एकत्रित करून यावेळी दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *