[ad_1]

कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु असताना काळजाचा ठोका चुकला. कारण पाकिस्तानचा फलंदाज खेळत असताना त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं. या गोष्टीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं घडलं तरी काय, हे स्पष्टपणे दिसत आहे.ही गोष्च घडली ती २१ व्या षटकात. त्यावेळी रवींद्र जडेजा हा गोलंदाजी करत होता. या २१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. या चेंडूचा सामना पाकिस्तानचा आगा सलमान करत होता. जडेजाच्या या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचे त्याने ठरवले होते. त्यामुळे जेव्हा चेंडू पडला तेव्हा तो थोडा खाली झुकला आणि त्याने बॅट आडवी केली. पण यावेळी सलमानला जडेजाच्या चेंडूचा अंदाज घेता आला नाही. कारण जेव्हा हा चेंडू पडला तेव्हा तो सलमानच्या बॅटवर आला नाही. कारण सलमानचा अंदाज चुकला होता. त्यामुळे हा चेंडू सलमानच्या बॅटच्या कडेवर लागला. त्यानंतर हा चेंडू थेट सलमानच्या चेहऱ्याच्या दिशेने गेला. हा चेंडू एवढ्या वेगात होता की, हा चेंडू थांबवणे सलमानला जमले नाही. हा उडालेला चेंडू थेट सलमानच्या चोहऱ्यावर आदळला. या चेंडूचा फटका एवढा जबरदस्त होता की, जेव्हा तो चेहऱ्यावर लागला तेव्हा लगेच रक्त यायला सुरुवात झाली. हे रक्त थांबायचे नावच घेत नव्हते. त्यावेळी भारताचा यष्टीरक्षक लोकेश राहुल हा त्याच्या जवळ गेला आणि त्याची विचारपूस केली. त्यानंतर लगेच पाकिस्तानच्या संघाचे डॉक्टर धावत मैदानात आले. डॉक्टरांनी सलमानवर तातडीने उपचार केले. थोडावेळ त्यानंतरही रक्त येत होते. पण या उपचारानंतर काही वेळात रक्त यायचे थांबले. त्यामुळे चाहत्यांनाही हायसे वाटले. कारण जेव्हा सलमानच्या नाकाजवळून रक्त यायला सुरुवात झाली होती तेव्हा एका क्षणाला चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.या घटनेनंतर सलमानने खेळायचा निर्णय घेतला आणि तो खेळला. या गोष्टीचा व्हिडिओ आता चागंलाच व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *