पळशीच्या जि.प. शाळेत आई मेळावा उत्साहात:प्राथमिक शाळेत आई मेळावा व माहिती अधिकार दिन साजरा
कन्नड तालुक्यातील पळशी बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आई मेळावा व माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुभाष जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मीनाताई मुळे, सुशीला जाधव, ज्योती कुंवर आदी उपस्थित होते. आपण आपलं खंबीर होऊन स्वतःसाठी लढायला शिका, व्यक्ती ओळखायला शिका, जो विश्वासू असतो तोच आपल्यासाठी हानिकारक असतो, असे सांगून मुलगी घरी आल्यानंतर ती काय म्हणते, तिची समस्या काय आहे, हे आपण ऐकून घेणे आपले कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले. अश्विनी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. समाजात जीवन जगत असताना महिलांना किती त्रास होतो, हे सांगताना प्रतीक्षा जाधव यांना अश्रू अनावर झाले होते. विद्या गायकवाड यांनी आईच्या संस्कारावर या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, अंधार फार झाला, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, हे गीत सादर केले.