पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन:काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची बीडीओंना धमकी

पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन:काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची बीडीओंना धमकी

अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समिती अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन अशी धमकी दिली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशलल मिडीयावर व्हायरल होत आहे. दरम्यान अक्कलकोट तानलुक्यात महाविकास आघाडीतर्फे खराब रस्ताच्याविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती अधिकाऱ्यांना निवेदन देताना म्हेत्रे यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे. नेमके सिद्धाराम म्हेत्रेंचे वक्तव्य काय? सिद्धाराम म्हेत्रें म्हणाले की, हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळं हे जाळायला मला फार वेळ लागणार नाही. या ऑफिसला जाळ लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो मग काय करणार तुम्ही. पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेन, माझे पोलिस किंवा कोणीही… काही करु शकत नाही. माझ्यावर एक केस दाखल होईल. आम्ही त्यासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात 25 वर्षे केस चालेल असेही म्हेत्रे म्हणाले. माझं आयुष्य कोर्ट, कचेरी, केस त्यातच गेले, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. शांत बसलो म्हणून तुम्ही फार करू लागलात का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे? सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे. सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. सोलापूर काँग्रेसचे ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपदावर काम केले आहे. नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देश बीफ निर्यातीत नंबर वन महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने सोमवारी आदेश जारी केला. यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य सरकारने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले आहे, मी या पावलाचे स्वागत करतो, कारण मी शेतकरी आहे आणि ‘गाय’ ही प्रत्येक शेतकऱ्याची आई आहे. पण, निवडणुकीपूर्वी राजकीय खेळी म्हणून हे केले गेले आहे.वाचा सविस्तर

​अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समिती अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन अशी धमकी दिली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशलल मिडीयावर व्हायरल होत आहे. दरम्यान अक्कलकोट तानलुक्यात महाविकास आघाडीतर्फे खराब रस्ताच्याविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती अधिकाऱ्यांना निवेदन देताना म्हेत्रे यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे. नेमके सिद्धाराम म्हेत्रेंचे वक्तव्य काय? सिद्धाराम म्हेत्रें म्हणाले की, हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळं हे जाळायला मला फार वेळ लागणार नाही. या ऑफिसला जाळ लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो मग काय करणार तुम्ही. पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेन, माझे पोलिस किंवा कोणीही… काही करु शकत नाही. माझ्यावर एक केस दाखल होईल. आम्ही त्यासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात 25 वर्षे केस चालेल असेही म्हेत्रे म्हणाले. माझं आयुष्य कोर्ट, कचेरी, केस त्यातच गेले, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. शांत बसलो म्हणून तुम्ही फार करू लागलात का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे? सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे. सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. सोलापूर काँग्रेसचे ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपदावर काम केले आहे. नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देश बीफ निर्यातीत नंबर वन महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने सोमवारी आदेश जारी केला. यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य सरकारने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले आहे, मी या पावलाचे स्वागत करतो, कारण मी शेतकरी आहे आणि ‘गाय’ ही प्रत्येक शेतकऱ्याची आई आहे. पण, निवडणुकीपूर्वी राजकीय खेळी म्हणून हे केले गेले आहे.वाचा सविस्तर  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment