परभणी : माणसाने मनामध्ये एखादी गोष्ट ठरवली तर तो काय करू शकतो याचा प्रत्यय परभणीच्या डोंगराळ भागामध्ये वसलेल्या खादगाव येथे आला आहे. गावच्या महिला सरपंच सावित्री राजेश फड यांनी गावात लोकसहभागातून चळवळ राबवून जलसंधारणाची कामे करून गाव कायमचे दुष्काळमुक्त केले आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली असल्याने गावातील पाचशे ते सहाशे एकर जमीन पाण्याखाली आली आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात देखील पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच महिला सक्षमीकरण, नागरिकांच्या आरोग्य, आणि मुलांच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ भागांमध्ये वसलेल्या खादगाव येथे २०१९ पूर्वी शेतकऱ्यांना केवळ खरीप हंगामाच्या पिकांवर समाधान मानावे लागत होतं. कारण, गावाच्या नशिबी दुष्काळ होता. मात्र, सावित्री राजेश फड या सरपंच झाल्यानंतर गावाच्या नशिबी असलेला दुष्काळ पुसून काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांनी लोकसहभागातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. या कामासाठी त्यांना पती जिल्हा परिषद सदस्य राजेश फड यांचे देखील मोठ्या मदत लाभली.

गावच्या सरपंच असलेल्या सावित्री फड आपल्या दोन मुलांना घेऊन सकाळी आठ वाजताच जलसंधारणाच्या कामावर जाऊन स्वतः खोदकाम करायच्या यामुळे गावातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात या कामांमध्ये सहभाग नोंदवल्याने गावामध्ये पावसाचे पाणी अडवण्यासाठी खादगाव ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे गावच्या नशिबी असलेल्या दुष्काळ आता पुसून निघाला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी देखील पाणी उपलब्ध होत असल्याने ५०० ते ६०० एकर जमीन पाण्याखाली आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकरण बदललं आहे.

भारतात धुमाकूळ घालायला येताहेत हे भन्नाट लॅपटॉप्स, पाहा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

सरपंच सावित्री फड एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर गावातील नागरिकांना गावातच सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी गावामध्ये सुसज्ज असे आरोग्य उपकेंद्र बांधले आहे. या ठिकाणीच नागरिकांवर उपचार केले जात आहेत. गावातील विद्यार्थी इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेण्यासाठी गंगाखेड या तालुक्याच्या ठिकाणी जात असल्याने त्यांनी गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्य सेमी इंग्लिशचे शिक्षण देण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या. त्यानंतर गावातील शाळा डिजीटल करण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने सेमी इंग्लिश चे शिक्षण दिले जात आहे. यासोबतच शाळेला चक्क रेल्वेचे रुपडे देण्यात आले आहे.

शाळेमध्ये विजेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी शाळेला सोलार उपलब्ध करून दिले आहे. महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी गावातील महिलांचे २५ बचत गट तयार करून त्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही त्यांनी पुढाकार घेतला आहे.

सरपंचपदाची संधी मिळाली, सुवर्णाताईंनी गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली काढला

दूषित पाणी पिल्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य दोष धोक्यात येऊ नये यासाठी सरपंच सावित्री फड यांनी गावातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरोओ प्लांटची निर्मिती करून गावातील नागरिकांना शुद्ध पाणी ग्रामपंचायती मार्फत दिले जात आहे. सावित्री फड एवढ्यावर थांबणार नसून गावात अडवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे

लग्न करुन सासरी जाणाऱ्या लेकींना गावाकडून मायेची माहेरची साडी, ऐनापूर मुलींच्या पाठीशी उभं राहणार

ग्रामपंचायत कन्यादान करणार, माहेरची साडी देणार; प्रत्येक लेकीच्या पाठिशी उभं राहणारं कोल्हापुरातील एक गावSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *